मुंबई | Mumbai
दहावी, बारावी मुख्य परीक्षेत अपयश आल्यास विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाऊ नये, तसेच ज्या विद्यार्थ्यांना आपल्या गुणश्रेणीत सुधारणा करावीशी वाटते त्यांच्यासाठी घेण्यात येणाऱ्या पुरवणी परीक्षेचा (Class X,XII Suppelemantary Exam Result) निकाल सोमवारी (ता.२८) दुपारी एक वाजता ऑनलाइनद्वारे जाहीर झाला. विद्यार्थ्यांचे विषयनिहाय गुण ‘www.mahresult.nic.in’ या संकेतस्थळावर पाहता येतील. माहितीची छायांकित प्रत (प्रिंट आउट) तुम्हाला घेता येईल.
दहावी-बारावीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल पाहण्यासाठी संकेतस्थळ:
गुणांची पडताळणी, उत्तरपत्रिकांच्या छायाप्रत, पुनर्मूल्यांकनासाठी संकेतस्थळ:
-
दहावीसाठी : http://verification.mh-ssc.ac.in
-
बारावीसाठी : http://verification.mh-hsc.ac.in
पुरवणी परीक्षेच्या ऑनलाइन निकालानंतर लगेचच दुसऱ्या दिवसापासून परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना स्वत:च्या अनिवार्य विषयांपैकी (श्रेणी विषयांव्यतिरिक्त) कोणत्याही विशिष्ट विषयात त्यांनी संपादित केलेल्या गुणांची गुणपडताळणी, उत्तर पत्रिकांच्या छायाप्रत, पुनर्मूल्यांकनासाठी संबंधित विभागीय मंडळाकडे ऑनलाइन पद्धतीने मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरून अर्ज करता येईल. जुलै-ऑगस्ट २०२३ पुरवणी परीक्षेच्या उत्तरपत्रिकेचे पुनर्मूल्यांकनासाठी ऑनलाइन अर्ज करण्यासाठी मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरून प्रथम उत्तरपत्रिकेची छायाप्रत घेणे अनिवार्य आहे.
छायाप्रत मिळाल्याच्या दिवसापासून त्यापुढील कार्यालयीन कामाच्या पाच दिवसांत पुनर्मूल्यांकनाच्या कार्यपद्धतीचा अवलंब करून संबंधित विभागीय मंडळाकडे विद्यार्थ्यांनी ऑनलाइन अर्ज करणे आवश्यक आहे. उत्तरपत्रिकेच्या पुनर्मूल्यांकन करायचे असल्यास विद्यार्थ्यांनी अधिक माहितीसाठी संबंधित विभागीय मंडळाकडे संपर्क साधावा, असे राज्य मंडळाने स्पष्ट केले आहे. फेब्रुवारी-मार्च २०२३ च्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या आणि श्रेणी सुधार योजनेअंतर्गत परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना पुन:श्च फेब्रुवारी-मार्च २०२४ मध्ये होणारी अंतिम परीक्षा देता येणार आहे, अशी माहिती राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी दिली.
शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत इयत्ता दहावीची पुरवणी लेखी परीक्षा १८ जुलै २०२३ ते १ ऑगस्ट २०२३ या कालावधीत घेण्यात आली होती. तर इयत्ता बारावीची पुरवणी लेखी परीक्षा १८ जुलै २०२३ ते ८ ऑगस्ट २०२३ या कालावधीत घेण्यात आली होती.