Tuesday, March 25, 2025
Homeनाशिकरिक्षाचालकाने बुजवले खड्डे

रिक्षाचालकाने बुजवले खड्डे

देवळाली कॅम्प । वार्ताहर Deolali Camp

- Advertisement -

सध्या पावसाचे दिवस असल्याने सर्वच रस्त्यांवरती खड्ड्यांचे साम्राज्य वाढले असून, हीच परिस्थिती धोंडीरोडची झाली आहे. प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याने रिक्षाचालक सुरेश गुळवे यांनी स्वतः हा रिक्षात मुरुम, विटा, दगडगोटे आणून रस्त्यावरील खड्डे बुजवत असल्याची पोस्ट सोशल मीडिया व्हायरल होताच परिसरातील नागरिकांनी रिक्षाचालकाचे कौतुक केले आहे.

कॅन्टोन्मेन्ट बोर्ड वॉर्ड क्र. 7 मधील शिंगवे बहुला गावाला जोडणारा धोंडीरोड हा एकमेव रस्ता असून सध्या या रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली आहे. रस्त्यावरती मोठमोठे खड्डे पडल्याने शाळकरी मुलांसह वाहनधारक, रिक्षाचालकांना या खड्ड्यांचा त्रास सहन करावा लागत आहे. शिवाय वाहनांचेही नुकसान होत असल्याने ही बाब लक्षात घेऊन रिक्षाचालक सुरेश गुळवे यांनी कुणाचीही वाट न पाहता रानातून मुरुम, विटा, दगडगोटे आणून पाटी, फावड्याच्या साहय्याने रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे काम सुरू केले. परिसरातील नागरिकांनी गुळवे यांचे कौतुक केले आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Prashant Koratkar : मोठी बातमी! प्रशांत कोरटकरला तीन दिवसांची पोलीस...

0
कोल्हापूर | Kolhapur छत्रपती शिवाजी महाराजांचा (Chhatrapati Shivaji Maharaj) अपमान आणि इतिहास संशोधक इंद्रजित सावंत (Indrajit Sawant) यांनी धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरला कोल्हापूर पोलिसांनी काल...