Saturday, July 27, 2024
Homeनाशिकएचएएल वसाहतीतील रस्ता तातडीने खुला करावा

एचएएल वसाहतीतील रस्ता तातडीने खुला करावा

ओझर। प्रतिनिधी Ozar

रस्त्याची वहिवाट हा नागरिकांचा नैसर्गिक अधिकार असून तो हिरावून घेता येत नाही. त्यामुळे एचएएल प्रशासनाने ( HAL Adminstration ) सदरचा रस्ता तातडीने खुला करावा (road should be opened immediately ) अन्यथा तहसीलदारांच्या विशेष कायद्याअंतर्गत सदरचा रस्ता खुला करण्यात येईल. त्यामुळे उपविभागीय अधिकारी, तहसीलदार यांनी तत्काळ कार्यवाही करावी, अशी सूचना जिल्हाधिकारी सूरज मांढरे ( Collector Suraj Mandhare ) यांनी दिली आहे.

- Advertisement -

एचएएल वसाहतीमधून जाणारा जुना रस्ता खुला करावा अशी मागणी अनेक दिवसांपासून होती. करोना महामारी व सुरक्षेचे कारण देत एचएएल प्रशासनाने हायवे 1 नंबर गेट ते मरिमाता गेट हे गेल्या दोन वर्षापासून बंद केले आहे.

त्यामुळे सुकेणेसह परिसरातील दीक्षी, दात्याणे, जिव्हाळे, थेरगाव, ओणे, भाऊसाहेबनगर, पिंपळस रामाचे आदी गावातील शेतकरी, ग्रामस्थ, शालेय विद्यार्थी, नोकरदार यांना बाजारपेठेत जाण्याकरीता ओझर गावातून ये-जा करावी लागत होती. त्यातच ओझर शहरातील रस्ते अरूंद असल्याने वाहनांची कोंडी होऊन शेतकर्‍यांना अडचणींचा सामना करावा लागत होता. नागरिकांनी एचएएल कंपनीला निवेदन दिले.

मात्र त्याबाबत कोणताही तोडगा निघत नसल्याने संबंधित गावचे सरपंच, उपसरपंच, सदस्य यांनी आमदार दिलीप बनकर यांची भेट घेत त्यांना निवेदन दिले. जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांचे अध्यक्षतेखाली व आमदार बनकर यांचे उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली होती.

याप्रसंगी उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे, निफाडच्या उपविभागीय अधिकारी डॉ. अर्चना पठारे, तहसीलदार शरद घोरपडे, नाशिक शहर काँग्रेस अध्यक्ष शरद आहेर, पं.स. सदस्य बंडू आहेर, पिंपळस रामाचे सरपंच तानाजी पूरकर, उपसरपंच विलास मत्सागर, कसबे सुकेणे उपसरपंच धनंजय भंडारे, मौजे सुकेणे सरपंच सचिन मोगल, ओणे सरपंच संदीप कातकाडे, उपसरपंच शांताराम निसाळ, थेरगाव सरपंच दत्तू बोराडे, उपसरपंच वंदना काळे, जिव्हाळे सरपंच किशोर पागेरे, दात्याणे उपसरपंच सुनील पवार, दीक्षी सरपंच देवीदास चौधरी, नंदू सांगळे, भूषण धनवटे, रावसाहेब चौधरी, रमेश घुगे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या