Saturday, May 4, 2024
Homeनाशिकसाठ वर्षांपूर्वीचा रस्ता खुला

साठ वर्षांपूर्वीचा रस्ता खुला

शिरवाडे वाकद। वार्ताहर Shirvade Vakad

महसूल खात्याने revenue department कुठलाही तंटा निर्माण न होऊ देता मौजे शिरवाडे ते मोर्विस Shirvade to Morvis या 60 वर्षांपासून निष्क्रिय रस्त्याचे पुनर्जीविकरण केल्याने सुमारे 300 एकर क्षेत्राचा रस्त्याचा प्रश्न कायमस्वरूपी मिटला आहे.

- Advertisement -

जिल्ह्याच्या सरहद्दीवर वसलेल्या शिरवाडे गावाला सध्या नानाविध संकटांचा सामना करावा लागत आहे. शिरवाडे गाव हे तालुक्यासह जिल्ह्याच्या सरहद्दीवर आहे. त्यातच गाव नकाशात मौजे शिरवाडे ते मोर्विस हा रस्ता दाखवला असला तरी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केल्याने गेल्या 60 वर्षापासून हा रस्ता नामशेष झाला होता.

त्यामुळे परिसरातील शेतकर्‍यांना वाहिवाटी रस्त्याचा प्रश्न निर्माण होऊन सुमारे 300 एकर जमीन पिकविण्यात अडचण निर्माण झाली होती. इतरांच्या शेतातून वाहने जात असल्याने वारंवार वाद निर्माण होत होते. त्यामुळे या भागातील शेतकर्‍यांनी याबाबत देवगाव मंडळ अधिकारी पंडित यांना हा रस्ता खुला करून देण्याची विनंती केली.

यासंदर्भात मंडळ अधिकारी पंडित यांनी ज्यांनी रस्त्यावर अतिक्रमण केले आहे त्यांच्याशी चर्चा करून कुठल्याही न्यायालयात न जाता सामोपचाराने हा वाद मिटवावा, असे आवाहन केले. त्यांच्या अवाहनास सगळ्याच नागरिकांनी प्रतिसाद दिला.

त्यानुसार गट नं. 43 ते 53 व गट नं. 27 ते 32 यामधून मंडळ अधिकारी पंडित, तलाठी नंदकिशोर गायकवाड, रावसाहेब सोर, अमोल चिताळकर, भगवान धनराव, पो.पा. रामनाथ तनपुरे, विजय आवारे, भूषण आवारे यांच्या उपस्थितीत जेसीबीच्या सहाय्याने हा रस्ता खुला करण्यात आला.

ग्रामीण भागात रस्त्यांचे मोठ्या प्रमाणावर न्यायालयात वर्षांनुवर्षे वाद आहेत. त्यामुळे विकासाला अडसर होत आहे. मात्र कुठलाही वाद होऊ न देता शेतकर्‍यांचे व्यवस्थित मनोमिलन घडवून आणून रस्ता खुला केल्याबद्दल महसूल अधिकारी व कर्मचार्‍यांचे परिसरातून अभिनंदन होत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या