Friday, April 25, 2025
Homeमुख्य बातम्यालोकसहभागातून केला रस्ता दुरुस्त

लोकसहभागातून केला रस्ता दुरुस्त

खोकरविहीर । वार्ताहर Khokvihir

सुरगाणा तालुक्यातील आंबोडे ग्रामपंचायतीमधील सरमाळ हे उंच डोंगरावर गांव वसलेलं असुन पावसाळ्यात सरमाळ गावातील 40 शेतकरी दोडका पीक मोठया प्रमाणात घेत असतात.

- Advertisement -

आंबोडे ते आंबेपाडा दरम्यान 1 कि. मी. रस्ता पाऊसाच्या पाण्यामुळे खड्डे पडल्याने वाहनधारकांना वाहने चालवणे कठीण परिस्थिती उद्भभवत असून हा 1 कि. मी. रस्ता 6 ते 7 वर्ष होऊन गेले, परंतु अद्याप नवीन डांबरीकरण, दुरुस्ती झालेली नसल्याने आपली समस्या आपणच दूर करावी, या उद्देशाने सरमाळ गावातील तरूण वर्ग यांनी गाव एकत्र करुन वर्गणी गोळा करुन खड्डी टाकून खड्डे बुजवून रस्ता दुरुस्त करण्यात आला.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

सरमाळ गावची लोकसंख्या जेमतेम 476 असुन गावात 4 थी पर्यंत शाळा आहे. गावातील विद्यार्थी दैनंदिन अंबुपाडा, बेडसे आश्रमशाळेत ये -जा करतात. सरमाळ गावातील भाजीपाला याच रस्त्यावरुन वाहतूक होत असते. त्यामुळे सुरक्षित जाण्यासाठी गावाने रस्ता दुरुस्त करण्यासाठी पुढाकार घेऊन खड्डे बुजविण्यात आले. हा रस्ता डांबरीकरण व्हावा अशी मागणी ग्रामस्थ करीत आहे.

रस्ता दुरुस्तीसाठी सरमाळ गावातील विठ्ठल चौधरी, बाबुराव चौधरी, अंबादास चौधरी, एकनाथ शिंगाडे, रंगनाथ शिंगाडे, प्रकाश गायकवाड, सीताराम गायकवाड, पांडुरंग शिंगाडे, भास्कर चौधरी, पोलीस पाटील राजेश चौधरी, विष्णू चौधरी, सुनील चौधरी, हेमराज चौधरी, पंकज भोये, शेवंती चौधरी, जयवंता चौधरी, सखीबाई चौधरी, प्रमिला शिंगाडे आदींनी पुढाकार घेतला आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

दहशतवाद

Sharad Pawar: “आम्ही दहशतवाद संपवला, आता काही चिंता नाही असे सांगितले...

0
मुंबई | Mumbai पहलगाम बैसरन घाटीमध्ये पर्यटकावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारने पाकिस्तानला जो संदेश दिला आहे, तो योग्यच आहे. अशा निर्णयात सर्वपक्षीयांनी सरकार सोबत...