Saturday, July 27, 2024
Homeजळगावगावाच्या सर्वांगीण विकासासाठी ग्रामसेवकांची भूमिका महत्वाची!

गावाच्या सर्वांगीण विकासासाठी ग्रामसेवकांची भूमिका महत्वाची!

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

शासनाच्या विविध योजना ग्रामीण भागातील जनतेपर्यंत पोहोचवून गरजूंना लाभ देण्याचे काम ग्रामसेवक (Gramsevak) करीत असल्याने गावाच्या (village) सर्वांगीण विकासामध्ये (development)ग्रामसेवकाची भूमिका महत्वपूर्ण आहे. ग्रामसेवक व सरपंचांनी कर्तव्य भावनेतून गावाच्या सर्वांगीण विकासासाठी पारदर्शकपणे काम करावे, असे आवाहन राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील (Guardian Minister Gulabrao Patil) यांनी केले. येथील नियोजन सभागृहात ग्रामविकास विभाग, जिल्हा परिषद, जळगाव यांच्यावतीने आयोजित आदर्श ग्रामसेवक पुरस्कार (Adarsh Gram Sevak Award Distribution) वितरण सोहळा व सुजल, समृध्द जळगाव अभियान (डासमुक्त जळगाव) शुभारंभाप्रसंगी ते बोलत होते.

- Advertisement -

खडसे, उध्दवांना महाजनी टोला

यावेळी व्यासपीठावर ग्रामविकास मंत्री ना.गिरीश महाजन, आमदार राजूमामा भोळेेे, आ.किशोर पाटील, खा.उन्मेश पाटील, माजी जि.प.अध्यक्ष अशोक कांडेलकर, माजी जि.प.सदस्य प्रभाकर सोनवणे, गजेंद्र सोनवणे, जिल्हाधिकारी अमन मित्तल, जि.प.सीईओ डॉ.पंकज आशिया, अतिरिक्त मुख्यकार्यकारी अधिकारी बाळासाहेब मोहन, उपमुख्यकार्यकारी अनिकेत पाटील, मुख्य लेखा व वित्त अधिकारी बाबुलाल पाटील, प्राथमिक शिक्षणाधिकारी विकास पाटील, ग्रामसेवक संघटनेचे संजय निकम आदी व्यासपीठावर उपस्थित होते. त्यानंतर तीन वर्षातील 43 आदर्श ग्रामसेवक पुरस्कारार्थींना पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री ना.गुलाबराव पाटील, ग्रामविकासमंत्री ना.गिरीश महाजन यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते स्मृतीचिन्ह, शाल,पुष्पगुच्छ आणि महिलांना साडीचोळी देवून गौरविण्यात आले.

ना.पाटील पुढे म्हणाले की,ग्रामीण भागातील गावात गटारी किती तुंबल्या यावर ग्रामसेवकांची कामगिरी अवलंबून आहे.तेव्हाचा ग्रामसेवक आणि आताचा ग्रामसेवक यांच्यात खूप मोठा बदल झाला आहे. आता ग्रामसेवक ऑनलाईन बोलायला लागला आहे. ग्रामीण भागात तळाठी व ग्रामसेवक आप्पांवर मोठा विश्वास टाकला जातोे. आमचा उतारा तुमच्या कपाटात आहे. ग्रामसेवक 58 वषर्र् तर जिल्हाधिकारी व जि.प.सीईओ यांना 60वर्ष नोकरी असते. मात्र, आम्हाला दर पाच वर्षांनी सतरानंबरचा फार्म भरावा लागतो. पूर्वी राजाचा मुलगा राजा व्हायचा. आता मतदारांच्या व्होेटातून राजा तयार होतो, असे सांगून आदर्श ग्रामसेवकांमध्ये महिला आदर्श ग्रामसेवकांची संख्या वाढली पाहिजे, अशी कोपरखळी पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांनी ग्रामसेवकांना लगावली.

पश्चिम रेल्वेने प्रवास करणार्‍या प्रवांशासाठी ही बातमी आहे महत्त्वाची : अनेक रेल्वेगाडया रद्द

ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन म्हणाले की, ग्रामीण भागात तलाठी व ग्रामसेवक ही गावाच्या विकासाची चाके असतात. मात्र, काही अशी गावे आहेत की कोट्यवधी रुपये खर्चुन पाणी मिळत नाही. त्याठिकाणी ग्रामसेवकच त्या गावासाठी पाणी देण्याची व्यवस्था करतो.आता आदर्श ग्रामसेवकांना पुरस्कार मिळाल्यामुळे त्यांची जबाबदारी वाढली आहे. शासनाच्या योजना ग्रामीण भागात पोहोचविण्याचे काम ग्रामसेवकांनी केले पाहिजे. चांगले काम दिशादर्शक असते. म्हणून सर्वांनी ठरविले तर आपल्या गावाची नव्हे तर देशाची प्रगती होईल, असा आशावाद ना.गिरीश महाजन यांनी केला.

बनावट वेब साईटच्या माध्यमातून व्यापार्‍याला दिड लाखांचा गंडा

याप्रसंगी ना.गिरीश महाजन, पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी जि.प.सीईओ यांच्या कामकाजाविषयी समाधान व्यक्त करुन गौरव केला. यावेळी जि.प.सीईओ डॉ.पंकज आशिया, आमदार राजूमामा भोळे, आमदार किशोर पाटील यांनी मार्गदर्शन केले. प्रास्ताविक ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्यकार्यकारी अनिकेत पाटील यांनी तर सूत्रसंचालन मिलींद पाटील यांनी केले. आभार अनिकेत पाटील यांनी मानले.

2014-2015

यावर्षासाठी आदर्श ग्रामसेवक पुरस्कारार्थी शितल पाटील पिंगळवाडे ता.अमळनेर, विकास पाटील वाक,ता.भडगाव, गणेश सुरवाडकर मांडवेदिगर,ता.भुसावळ,दिनेश वळवी निमखेड,ता.बोदवड, दीपक जोशी कोळंबा,ता.चोपडा,हरिभाऊ पाटे तळोंदे प्र.चा,ता.चाळीसगाव, प्रल्हाद पाटील जळू,ता.एरंडोल, प्रतिभा पाटील मादणी,ता.जामनेर,रवींद्र चौधरी ग्रा.पं.परधाडे ता.पाचोरा, ज्ञानेश्वर साळुंके ग्रा.पं.बोदवड ता.मुक्ताईनगर, देवीदास पाटील ग्रा.पं.मांगी ता.रावेर, सुनिल फिरके ग्रा.पं.वढोदे प्र.सावदा, ता.यावल यांचा गौरव करण्यात आला.

2015-2016

कविता साळुंखे ढेकूसीम,ता.अमळनेर, भिला बोरसे खेडगाव खु.ता.भडगाव, गोविंदा राठोड, पिंपळगाव बु.ता.भुसावळ,पंढरीनाथ झोपे मनूर बु.ता.बोदवड,नंदकिशोर सोनवणे र्भाडू,ता.चोपडा, दिलीप अहिरे सायगाव, ता.चाळीसगाव, नारायण माळी जवखेडे खु.ता.एरंडोल, संदीप महाजन कल्याणेहोळ ता.धरणगाव,रुपाली साळुंखे डोमगाव ता.जळगाव,भास्कर महाजन पळासखेडे, ता.जामनेर,अविनाश पाटील दुसखेडा, ता.पाचोरा,नरेंद्र साळुंखे आडगाव-तरवाडे खु.ता.पारोळा, मनोहर चौधरी कर्की, ता.मुक्ताईनगर, कुंदन कुमावत विवरे खु.ता.रावेर,संजीव चौधरी चिखली खु. ता.यावल यांना सन्मानित केले.

2016-2017

राजेश पाटील रणाईचे ता. अमळनेर, शरद पाटील वडगाव बु.ता.भडगाव,पंकज चौधरी जाडगाव ता.भुसावळ, चिंतामण राठोड राजूर ता.बोदवड, मधुकर चौधरी वेळोदे, ता.चोपडा,सविता पांडे चितेगाव ता.चाळीसगाव, रमेश पवार गालापूर,ता.एरंडोल, अनिल पाटील अंजनविहिरे-वाकटुकी,ता.धरणगाव, उल्हासराव जाधव मोहाडी ता.जळगाव, गोविंदा काळे बिलवाडी,ता.जामनेर, स्वाती पाटील गोरडखेडा,ता.पाचोरा, प्रिती जढाल पिंप्री अकाराऊत ता.मुक्ताईनगर, रवींद्रकुमार चौधरी पुरी-गोलवाडे,ता.रावेर, रुबाब महोम्मद तडवी गाड्रया ता.यावल यांना आदर्श पुस्काराने सन्मानित करण्यात आले.

आदिवासी भागात उत्कृष्ट कार्य

यावल तालुक्यातील गाड्रया येथील ग्रामसेवक रुबाब मोहम्मद तडवी यांनी आदिवासी भागात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल त्यांना आदर्श ग्रामसेवक पुरस्कार देवून ग्रामविकास मंत्री ना.गिरीश महाजन, पालकमंत्री गुलाबराव पाटील, आमदार किशोर पाटील, आमदार राजूमामा भोळे, जिल्हाधिकारी अमन मित्तल, सीईओ डॉ. पंकज आशिया ग्रामसेवक संघटनेचे राज्य अध्यक्ष संजीव निकम, जिल्हा अध्यक्ष नंदकुमार गोराळे, बीडीओ मंजूश्री गायकवाड यांच्या उपस्थितीत सन 2016-17 या वर्षाचा आदर्श ग्रामसेवक पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले.

- Advertisment -

ताज्या बातम्या