धुळे – प्रतिनिधी dhule
गुरांना लम्पी (Lumpy) या संसर्गजन्य आजाराचा (Infectious disease) प्रादुर्भाव होण्याचा संभव असतांनाही तालुक्यातील नगाव येथे गुरांचा बाजार (Cattle market) भरविल्याप्रकरणी 21 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
(maharastra) राज्यासह जिल्ह्यात गुरांवरील लम्पी आजाराचा प्रादुर्भाव वाढला. जिल्ह्यात लम्पीमुळे काही गुरांचाही मृत्यू झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील बाजार समितीत्यामधील (Market Committee) गुरांचा खरेदी-विक्रीचे व्यवहारही बंद करण्यात आले आहे. असे असतांनाही काल नगाव येथे म्हशी व पारडुंचा बाजार भरविण्यात आला होता.
ही बाब लक्षात येताच पोलिसांनी तो उधळून लावला. याबाबत चिंचखेडा येथील पशुधन विकास अधिकारी शामकांत अण्णासाहेब हिरे (वय 53) यांनी पश्चिम देवपूर पोलिसात (police) तक्रार दिली आहे.
गुरांचा बाजार भरवून शासनाच्या आदेशाचे उल्लंघन केले म्हणून राजुभाई काठीयावाड, कमलभाई जबरभाई गढवी, मुकेशभाई गढवी, कनुभाई जबरभाई गढवी, रमेशभाई हिराभाई गरिया, मुकेश वेल्हाभाई भरवाड, राजुभाई मायाभाई भरवाड, मातंगभाई बलदेवभाई सानिया, दिलीपभाई गोविंदभाई अहिरे, करमनभाई कुकाभाई लामका, विजयभाई छगनभाई गमारा, विजयभाई जिलाभाई गरिया, रविभाई भोपाभाई लामरिया, दिनेशभाई कान्हाभाई भरवाड, मेहरभाई दुधाभाई सर्व रा.गुजरात व राजेंद्र माणिक शिंदे, तुकाराम प्रकाश मोरे रा. सारवे ता. शिंदखेडा, रमेश रामचंद्र पाटील रा. पाचोरा जि. जळगाव, अमित काकर रा. वरखेडी, हनिफ याकुब रा. शिंदखेडा, इसाकखाँ मुनाफ पठाण रा. अंबिका नगर, धुळे याच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोहेकाँ गायकवाड करीत आहेत.