धुळे dhule । प्रतिनिधी
धुळे तालुका पोलीस ठाण्याच्या (Dhule Taluka Police Station ) पथकाने अपहृत (hijacked)तरुणाचा (youth research) शोध घेतला असून मध्यप्रदेशातून (Madhya Pradesh) तिघांच्या मुसक्या आवळल्या आहेत. पीआय शिंदे (PI Shinde) यांच्या सतर्कतेने अपहृत तरुणाची सुखरुप सुटका झाली असून तिघा संशयितांना न्यायालयाने (court) दोन दिवस पोलीस कोठडी (police cell) ठोठावली आहे. अवघ्या 24 तासात संशयितांना अटक (arrested) करण्यात पोलिसांना यश आले आहे. अशी माहिती पत्रपरिषदेत पोलीस अधिक्षक संजय बारकुंड यांनी दिली आहे.
VISUAL STORY: होय….मी घटस्फोटासाठी अर्ज दिलाय…..
भुरसिंग रमेशचंद्र जोगी (21) रा.पहाडली सुरै ता. सिक्राय जि.दौसा, राजस्थान याचे दि.18 रोजी सुरत बायपास रोडवरील एसआरपीएफजवळून तिघांनी अपहरण केले होते. भुरसिंग याला जबरदस्तीने वाहनात बसवून अज्ञात ठिकाणी पळवून नेण्यात आले होते. याबाबत शरीफ मुन्सी खान यांनी धुळे तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यानुसार या गुन्ह्याचा तपास पोसई आर.डी. पाटील हे करीत होते.
हा गुन्हा दाखल झाल्यानंतर तपास अधिकारी पाटील यांनी अपहृत तरुणाचे लोकेशन शोधले. त्याआधारे अपहृत तरुण व तिघा संशयितांचा शोध घेवून त्यांना मुरैना ग्वाल्हेर (मध्यप्रदेश) येथून ताब्यात घेतले. अवघ्या 24 तासात अपहृत तरुणासह संशयितांचा शोध घेण्यात तालुका पोलिसांना यश आले.
VISUAL STORY : हा विवाहित व्यावसायिक विश्वसुंदरी मानुषी छिल्लरला करतोय डेटमंत्री गिरीश महाजनांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन
पोलिसांनी बिजेंद्र बाबुलाल यादव (26) रा. माछाडी, (राजस्थान), हरिसिंग किशोरराम जोगी (32), राजस्थान, हेतराम पप्पुराम यादव (30), रा.माछाडी. ता.राजगड या तिघांना अटक करुन काल तालुका पोलीस ठाण्यात आणून लागलीच न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने तिघांना दोन दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे. हे तिघेजण मजुरी करणारे असून त्यांची कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नसल्याची माहिती तालुका पोलिसांनी दिली आहे.
सदर कारवाई नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस निरीक्षक बी.जी. शेखर पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक संजय बारकुंड, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप मैराळे, पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे तालुका पोलीस ठाण्याचे पीएसआय राजश्री पाटील, पोकॉ राकेश मोरे, कांतीलाल शिरसाठ, पोकॉ योगेश पाटील, पोकॉ नितीन दिवसे यांच्या पथकाने केली.
डीपीडीसीच्या सभेत… आ.खडसेंचा ‘अभिमन्यू’बनावट कागदपत्रांद्वारे मिळविला छत्रपती क्रीडा पुरस्कार
भावाच्या शोधासाठी भुरसिंगचे अपहरण
काही दिवसांपूर्वी संशयितांच्या भावाचे मुक्ताईनगर येथून अपहरण झाले होते. त्यांचा भाऊ हा मुक्ताईनगर येथे भुरसिंग जोगी याच्यासोबत जीओ फायबर केबल टाकण्याच्या कामाला होता. आदल्या दिवशी तो भुरसिंग याच्यासोबत होता. त्यामुळे भुरसिंग यानेच आपल्या भावाचे अपहरण केल्याचा संशय संशयितांना होता. त्यामुळे तिघा संशयितांनी भुरसिंग याचे अपहरण केले होते. आमच्या भावाचे तु काय केले? याचा जाब विचारण्यासाठी तिघांनी त्याचे अपहरण केल्याची कबुली तिघांनी दिली.