मालेगाव । प्रतिनिधी Malegaon
शिक्षण खाते मोठे आव्हान आहे याची जाणीव आपल्याला आहे. अनेक प्रतिकूल परिस्थितीतून हा विभाग मार्गक्रमण करीत असल्याने भेडसावत असलेले प्रश्न सोडविण्यासाठी कष्ट घ्यावे लागणार आहे. या दृष्टिकोनातून राज्यातील या क्षेत्रात काम करीत असलेले मान्यवर, शालेय शिक्षण विभागाचे अधिकारी, शिक्षक, पालक व विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधत उद्भवत असलेल्या अडीअडचणी समजून घेत त्या दूर करण्याच्या दृष्टीकोनातून तत्काळ ठोस पाऊले उचलली जातील. यामुळे येत्या एक-दोन वर्षात राज्यातील शिक्षण क्षेत्राचे चित्र बदलले दिसून येईल, असे काम प्रत्यक्ष कृती करत आपण करणार असल्याची ग्वाही राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी येथे बोलतांना दिली.
विशेष संपादकीय : २२ डिसेंबर २०२४ – आधारवडाची समृद्ध छाया
महायुती सरकार मंत्र्यांचे खातेवाटप जाहीर करण्यात आले. यात शालेय शिक्षण खाते मंत्री दादा भुसे यांना देण्यात आले आहे. नागपूर अधिवेशनातून थेट मंत्री भुसे यांचे मालेगावी आगमन झाले असता महायुती पदाधिकारी-कार्यकर्ते तसेच शहरवासीयांतर्फे त्यांचे मोसमपुलावर जेसीबीने फुलांची उधळण करीत फटाक्यांची प्रचंड आतषबाजी करत जल्लोषात स्वागत केले गेले. यावेळी मंत्री भुसे यांची भव्य मिरवणूक काढण्यात आली. हजारो नागरीक या मिरवणुकीत सहभागी झाले होते. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, महात्मा गांधी व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करत मंत्री भुसे यांनी अभिवादन केले. या मिरवणुकीची सांगता संपर्क कार्यालय प्रांगणात केली गेली. यावेळी महायुतीसह विविध संघटना व समाजांतर्फे मंत्री भुसे यांचा नागरी सत्कार केला गेला. यावेळी सत्कारास उत्तर देतांना ते बोलत होते.
राज्य मंत्रिमंडळात नाशिक जिल्ह्याला मिळाली तीन मंत्रि पदे
शिवसेना जिल्हाप्रमुख अॅड. संजय दुसाने, ज्येष्ठ नेते सुरेशनाना निकम, भाजप जिल्हाध्यक्ष प्रा. निलेश कचवे, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष किशोर इंगळे, रिपाइं जिल्हाध्यक्ष भारत जगताप, माजी उपमहापौर निलेश आहेर, सखाराम घोडके, मनोहर बापू बच्छाव, भाजप प्रांतिक सदस्य लकी गिल, सुनिल देवरे, दीपक निकम, विनोद वाघ, राजेश अलीझाड, नंदूतात्या सोयगावकर, कृष्णा ठाकरे, नारायण शिंदे, प्रमोद शुक्ला, बाळू वाणी, प्रमोद निकम, भिकन शेळके, राजेश गंगावणे, सुधीर जाधव, केवळ हिरे, अनिल पाटील, शरद पाटील, प्रमोद पाटील, संगीता चव्हाण, साधना त्रिवेदी आदी महायुतीचे पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते.
आजचा देशदूतचा ई-पेपर वाचण्यासाठी क्लिक करा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांनी पुन्हा एकदा विश्वास दर्शवित शालेय शिक्षण मंत्रिपदाच्या माध्यमातून मालेगावसह महाराष्ट्राची सेवा करण्याची संधी दिली असल्याचे सांगत मंत्री दादा भुसे पुढे म्हणाले, राज्यात 1 लाख 8 हजार शाळा असून 65 हजार शाळा स्वायत संस्थेच्या आहेत तर 40 हजार शाळा खाजगी आहेत. 24 हजार अनुदानित तर 4 हजार विना अनुदानित शाळा असून, 14 हजार शाळा सेल्फ फायनान्सच्या आहेत. पहिली ते बारावीपर्यंत 2 कोटी 12 लाख विद्यार्थी असून 7 लाख 50 हजार शिक्षक, सेविका ज्ञानदानाचे काम करीत आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आरोग्य व शिक्षण क्षेत्रात भरीव काम राज्यात करायचे आहे अशी संवेदना व्यक्त केली असता आपण त्यांच्या मनातील गोष्टी निश्चित साकार करू, असे त्यांना आश्वस्त केले असल्याचे भुसे यांनी पुढे बोलतांना सांगितले.
शहर असो की ग्रामीण भागातील गरीबातील गरीब कुटूंबातील मुलांना दर्जेदार शिक्षण मिळाले पाहिजे. मोठ्या शाळेंची फी देखील मोठी पालकांना द्यावी लागते. या शाळेत विविध सुविधा विद्यार्थ्यांना मिळत असतात. त्यामुळे या शाळेतील स्पर्धेत गरिबांची मुले टिकली पाहिजे हा आपला दृष्टिकोन राहणार असल्याचे सांगत मंत्री भुसे पुढे म्हणाले, 5 ते 15 वर्षाच्या कालावधीत मुला-मुलींच्या बुध्दी व विचार घडत असतात. त्यामुळे ज्या शाळेत हे विद्यार्थी घडविले जाणार आहेत त्या विभागाची जबाबदारी मालेगाववर आली आहे. त्यामुळे या क्षेत्रात काम करणार्या मान्यवरांशी संवाद साधत आपण अडीअडचणी समजून घेणार आहोत. शिक्षणमंत्री एखाद्या खेड्याच्या शाळेत जातांना अचानक दिसणार आहे तर शिक्षण सचिव देखील शाळांना भेटी देतील यामागे कुणाला त्रास देण्याचा हेतू राहणार नाही, असे भुसे यांनी स्पष्ट केले.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महायुतीच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी जिवाचे रान करीत जनतेचे प्रचंड आशीर्वाद मिळून दिले. जनतेने लाखाचे मताधिक्य देत जो विश्वास दर्शविला आहे तो आगामी काळात निश्चित सार्थ ठरविला जाईल. विकासकामे असो की लहान-मोठे प्रश्न स्थानिक कार्यालयातून सोडविले जाईल यासाठी महायुतीची समिती आपण गठीत करणार आहोत. आपल्यावर मालेगावसह राज्याची जबाबदारी राहणार आहे. त्यामुळे महायुतीच्या पदाधिकार्यांना वेळ द्यावा लागेल, अशी अपेक्षा मंत्री भुसे यांनी शेवटी बोलतांना व्यक्त करत सत्काराबद्दल समस्त मालेगाववासियांचे आभार मानले. यावेळी ज्येष्ठ नेते सुरेश निकम, प्रा. निलेश कचवे आदींची भाषणे झालीत. सुत्रसंचालन अॅड. संजय दुसाने यांनी केले.