Saturday, May 4, 2024
Homeनाशिकजातपंचायत पिडीतांच्या व्यथा आता संयुक्त राष्ट्रसंघात

जातपंचायत पिडीतांच्या व्यथा आता संयुक्त राष्ट्रसंघात

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

जातपंचायतच्या सर्वच घटनांत महिलांवर अन्याय,अत्याचार (Injustice and violence against women) झाल्याचे दिसून येत आहे.

- Advertisement -

महिलांच्या इतर प्रश्नांसोबतच जातपंचायतच्या पिडीतांच्या व्यथा आता संयुक्त राष्ट्रसंघ (United Nations) पुरस्कृत आंतरराष्ट्रीय महिला आयोगात (International Commission on Women) मांडले जाणार असुन

त्यासाठी विधान परिषदेच्या उपसभापती (Deputy Speaker of the Legislative Council) व स्त्री आधार केंद्राच्या अध्यक्षा निलम गोर्‍हे (Neelam Gorhe, president of Stree Aadhar Kendra) विशेष प्रयत्न करत असल्याची माहिती जातपंचायत मूठमाती अभियानाचे (Jat Panchayat Muthmati Abhiyan) कार्यवाह कृष्णा चांदगुडे यांनी दिली आहे. आंतरराष्ट्रीय महिला आयोगाने (International Commission on Women) येत्या 6 ते 17 मार्च रोजी त्यांच्या न्युयॉर्क (New York) येथील त्यांच्या कार्यालयात 67 वे सत्र आयोजित केले आहे.

निलमताई अध्यक्षा असलेल्या स्त्री आधार केंद्राने इतर अनेक संस्थांच्या प्रमाणे संयुक्त राष्ट्रसंघाच्या अर्थिक व सामाजिक परिषदेचे सदस्यत्व घेतले आहे. या अंतर्गत 11 मार्च रोजी एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. ’ग्रामीण भागात महिलांनी सार्वजनिक ठिकाणचे आत्याचार (Atrocity) रोखण्याच्या कामात मिळविलेले यश’ या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला आहे.

गेल्या दहा वर्षांत ग्रामीण भागात महिला आत्याचार रोखण्यासंदर्भात आलेल्या अडचणीवर कशी मात केली, त्यातुन बाहेर निघण्यासाठी काय प्रयत्न झाले. याबरोबरच शासन स्तरावरून याबाबत मार्ग काढण्यासाठी कोणत्या प्रकारच्या विकास योजना तयार करता येईल, याचा उहापोह त्यात होईल. यामध्ये नाशिक येथील जातपंचायत मूठमाती अभियानाचे राज्य कार्यवाह कृष्णा चांदगुडे सहभागी होणार आहे.

याबाबत स्त्री आधार केंद्राने एक परिसंवाद आयोजित केला होता.’ ग्रामीण महिलांच्या आत्याचार विरोधी संघर्षात समाज व पोलिसांकडून अपेक्षा’ हा परिसंवादाचा विषय होता. निलमताई गोर्‍हे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमात तज्ञ व्यक्ती म्हणून कृष्णा चांदगुडे उपस्थित होते. त्यात त्यांनी जातपंचायतने पिडीत महिलांच्या दाहक व्यथा मांडल्या. ते ऐकून सभागृह स्तब्ध झाले होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या