Tuesday, May 21, 2024
Homeमुख्य बातम्याशरद पवार गटाला सुप्रीम कोर्टाचा दिलासा; पक्षचिन्ह आणि नावाबाबत निवडणूक आयोगाला दिले...

शरद पवार गटाला सुप्रीम कोर्टाचा दिलासा; पक्षचिन्ह आणि नावाबाबत निवडणूक आयोगाला दिले ‘हे’ निर्देश

नवी दिल्ली | New Delhi

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Vidhan Sabha Speaker Rahul Narvekar) यांनी मूळ राष्ट्रवादी काँग्रेसचा (NCP) दर्जा आणि पक्ष नाव व पक्ष चिन्ह दिल्यानंतर याविरोधात शरद पवार गटाने (Sharad Pawar Group) सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) धाव घेतली होती. त्यानंतर आज या प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली असता न्यायालयाने शरद पवार गटाला दिलासा देत निवडणूक आयोगाला (Election Commission) महत्त्वाचे निर्देश दिले आहेत…

- Advertisement -

सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र निवडणूक आयोगाला (Maharashtra Election Commission) विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीसाठी ‘तुतारी वाजवणारा माणूस’ आणि पक्षाचे नाव राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार हे चिन्ह (Symbol) राखीव ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच निवडणूक आयोगाने तुतारी चिन्ह राखीव ठेवावे आणि इतर कोणत्याही पक्षाला, उमेदवाराला देऊ नये, असे निर्देशही सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. याशिवाय न्यायालयाने अजित पवार (Ajit Pawar) यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला केवळ महाराष्ट्रच नव्हे तर इतर राज्यांच्या संदर्भात ते पोस्टरमध्ये शरद पवारांचे नाव वापरणार नाहीत, असे हमीपत्र देण्याचे निर्देशही दिले आहेत.

तसेच अजित पवार गटाने (Ajit Pawar Group) मराठी, हिंदी आणि इंग्रजी माध्यमांमध्ये नोटीस जारी करून त्यामध्ये सर्व प्रचारांच्या जाहीरातींमध्ये पक्षनाव आणि पक्षचिन्हाबाबतचे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याचे नमूद करावे, असेही निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.तर शरद पवार गटाची घड्याळ चिन्हामुळे मतदारांमध्ये (Voters) गोंधळ निर्माण होऊ शकतो, त्यामुळे ते गोठवा ही मागणी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे.

त्यासोबतच अजित पवार यांच्या गटासाठी घड्याळ हेच चिन्ह राहणार आहे. मात्र सर्वोच्च न्यायालयात याबाबत जो अंतिम निकाल येईल त्याच्या अधीन अटींसह ते वापरता येईल, असे न्यायालयाने स्पष्ट केले. दरम्यान काही दिवसांपूर्वी राज्यसभेची निवडणूक पार पडली. या निवडणुकीसाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने शरद पवार गटाला ‘तुतारी’ हे चिन्ह आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार हे नाव दिले होते. हे चिन्ह फक्त राज्यसभा निवडणुकीपर्यंत होते, अशी चर्चा होती. मात्र, आता सर्वोच्च न्यायालयाने आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकींसाठी सुद्धा हे नाव आणि चिन्ह शरद पवार गटाला वापरण्याची मुभा दिली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या