Saturday, September 14, 2024
Homeनाशिक'त्या' खून प्रकरणातील संशयित काही तासातच पोलिसांच्या हाती

‘त्या’ खून प्रकरणातील संशयित काही तासातच पोलिसांच्या हाती

नाशिक | Nashik

- Advertisement -

नाशिक शहरात काल सोमवार दि. ०६ रोजी सायंकाळच्या सुमारास दिंडोरी नाका (Dindori Naka) येथील गजबजलेल्या परिसरात किरण गुंजाळ या तरुणाची निर्घृण हत्या झाल्याची धक्कादायक घटना घडली होती. नाशिकमध्ये या घटनेने मोठी दहशत निर्माण झाली होती…

येथील दिंडोरी नाका भागात राहणाऱ्या किरण गुंजाळ (Kiran Gunjal) याची काळ सायंकाळच्या सुमारास काही तरुणांनी पाठलाग करत धारधार शस्त्राने वार करून निर्घृण हत्या करण्यात केली.

मोठी कारवाई! बोटीतून ४२५ कोटींचे ड्रग्ज जप्त; पाच जणांना अटक

किरण गुंजाळ हा गेल्या काही दिवसांपासून नाशिक कृषी उत्पन्न बाजार (Nashik Bajar Samiti) समितीत भाजीपाला (vegetables) विक्रीचा व्यवसाय करत होता. नवनाथ नगर परिसरात राहणारा किरण गुंजाळ सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास पेठरोड येथून दुचाकीवरून जात असतांना तीन ते चार संशयितांनी पाठलाग सुरू केला.

त्यानंतर गुंजाळ याने त्याची दुचाकी पेठफाटा येथे सोडून दिंडोरी नाक्याकडे पळ काढला. मात्र संशयित मारेकऱ्यांनी त्याला दिंडोरी नाक्यावर गाठत त्याच्या छातीत आणि पोटावरही धारदार शस्त्राने वार केले.

त्यामुळे रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या किरण गुंजाळ याच्या गळ्यावर संशयितांनी पुन्हा वार केले. या घटनेची माहिती मिळताच पंचवटी पोलिस (Panchvati Police) घटनास्थळी दाखल झाले, मात्र तोपर्यंत किरण मयत झाला होता. 

Dhulivandan 2023 : “दो घूँट मुझे भी पिला दे शराबी”…; मुंबई लोकलमधील Viral Video एकदा पाहाच

एकीकडे होळीच्या सनात सर्व दंग असताना, शहरात अशा गजबजलेल्या ठिकाणी तरुणाची हत्या होते, ही घटना दहशत निर्माण करणारी होती, त्याबरोबरच हत्त्या (murder) करणाऱ्या गुन्हेगारांना पकडणे हे मोठे आव्हान पोलिसांच्या समोर उभे राहिले होते.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

मात्र, या हत्येनंतर पंचवटी पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवत, अवघ्या काही तासांतच संशयितांना अटक करण्यात पोलिसांना यश आले असून, यात नितीन पांडुरंग साबळे, देवा उत्तम पाटील, दिपक रामान्ना या संशयितांना ताब्यात घेतले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या