Tuesday, March 25, 2025
Homeक्राईमSantosh Deshmukh Case : दिंडोरीच्या सेवा केंद्रात वाल्मिक कराडचा मुक्काम

Santosh Deshmukh Case : दिंडोरीच्या सेवा केंद्रात वाल्मिक कराडचा मुक्काम

सीआयडीकडून सीसीटीव्ही फुटेज ताब्यात

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

बीड जिल्ह्यातील (Beed District) मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य संशयित तसेच मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय वाल्मीक कराड (Walmik Karad) फरार असताना नाशिकच्या दिंडोरी तालुक्यातील (Dindori Taluka) श्री स्वामी समर्थ केंद्रात (आश्रम) आल्याचे गुन्हे अन्वेषण विभागाच्या (सीआयडी) तपासात उघड झाले आहे. केंद्रातून १६ डिसेंबर २०२४ चे सीसीटीव्ही फुटेज सीआयडीने जप्त केले असून, कराडने मुक्काम का व कोणाच्या सांगण्यावरून केला यावरून प्रधान सेवा केंद्र संशयाच्या फेऱ्यात सापडले आहे. दरम्यान, श्री स्वामी समर्थ गुरुपीठाने त्यांच्याबाबत झालेले सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.

- Advertisement -

सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील (Santosh Deshmukh Murder Case) संशयित वाल्मीक कराड व त्याचा नातलग विष्णू चाटे हे दोघे फरार असताना नाशिकमध्ये मुक्कामी राहिल्याचा दावा भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी गुरुवारी (दि.१६) पुणे येथील पत्रकार परिषदेत केला. कराड हा नाशिकच्या दिंडोरी येथील स्वामी समर्थ केंद्रात मुक्कामी होता. यासह याच समर्थ केंद्रप्रमुखांनी यापूर्वी महिलांचे लैंगिक शोषण केल्याच्या तक्रारी प्राप्त असल्याचाही आरोप देसाई यांनी केला.

त्या पार्श्वभूमीवर केंद्रप्रमुख अण्णासाहेब मोरे यांचे चिरंजीव चंद्रकांत मोरे यांनी शुक्रवारी (दि. १७) नाशिकमध्ये पत्रकार परिषद घेत देसाई यांनी केलेले आरोप फेटाळून लावले. यासह बदनामी करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाईचाही इशारा दिला आहे. यासंदर्भाने सीआयडी व हत्याप्रकरणी नेमलेली एसआयटी (SIT) सखोल तपास करत आहे. या तपासात आणखी कोणाचे पाय खोलात अडकणार, याकडे सर्वांचे लक्ष आहे. दरम्यान, ९ डिसेंबर रोजी संतोष देशमुख यांचे अपहरण होऊन १० डिसेंबर रोजी त्यांची हत्या झाल्याचे उघड झाले.

दरम्यान, बीडच्या केज पोलिसात संशयित सुदर्शन घुले, विष्णू चाटे, जयराम चाटे, प्रतीक घुले, महेश केदार, कृष्णा आंधळे व सुधीर सांगळे या सात जणांवर गुन्हा नोंद आहे. सुदर्शन, सुधीर आणि कृष्णा या तिघांना बीड पोलिसांनी अटक केली. सिद्धार्थ सोनवणेचाही सहभाग आढळल्याने त्याला कल्याणमधून ताब्यात घेतले. राजकारण तापल्यानंतर कराडलाही अटक (Arrested) झाली. दरम्यान, सव्वा महिन्यानंतरही कृष्णा आंधळे फरार आहे.

गुरुपीठाचा दावा

१४ डिसेंबर २०२४ रोजी दत्तजयंती होती. तेव्हापासून केंद्रात दत्त जयंती उत्सव सुरू होता. यादरम्यान, हजारो भाविक दर्शनासाठी आले. त्यावेळी आम्ही कोणालाही ‘व्हीआयपी ट्रिटमेंट’ दिली नाही किंवा मुक्कामाची सोयदेखील केली नाही. २७ डिसेंबर रोजी सीआयडीचे पथक व तपास यंत्रणांनी केंद्रातील सीसीटीव्ही फुटेजची मागणी केली. पथकांनी केंद्रात पाहणी केली. त्यावेळी सीसीटीव्ही फूटेज देण्यात आले. त्या फुटेजमध्ये कराड येऊन गेल्याचे दिसत असल्याचे पोलिसांनी आम्हाला सांगितले. मात्र, चाटे हा त्यांच्यासोबत नव्हता’, असा दावा गुरुपीठाचे चंद्रकांत मोरे यांनी केला आहे.

मुद्दे

संशयित चाटे याने मोबाईल नाशिकमध्ये कुठे फेकला?
सीआयडी व एसआयडीला अद्याप तो मोबाईल सापडलेला नाही.
कराड हा आश्रमात कोणाच्या मदतीने आला? कोणाला भेटला? याबाबत तपास सुरू
संशयित कृष्णा आंधळे नाशिकमध्ये असल्याची चर्चा; पोलिसांनी दावा फेटाळला.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Sanjay Raut : “२०१४ मध्ये युती तोडण्यास…”; राऊतांनी फडणवीसांची बाजू घेत...

0
नाशिक | Nashik महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics) मागील दशकभरात अनेक मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. दोन दशकांहून अधिक काळ सोबती असलेल्या भाजप आणि शिवसेना (BJP and...