Wednesday, December 4, 2024
Homeदेश विदेशपाकिस्तानच्या एअरबेसवर दहशतवादी हल्ला; अनेक जेट्स जाळले, व्हिडिओ व्हायरल

पाकिस्तानच्या एअरबेसवर दहशतवादी हल्ला; अनेक जेट्स जाळले, व्हिडिओ व्हायरल

नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi

पाकिस्तानच्या (Pakistan) उत्तरेकडील मियांवली येथील पाकिस्तानी हवाई दलाच्या प्रशिक्षिण हवाई तळावर (Terrorist Attack On Pakistani Airbase) शनिवारी पहाटे दहशतवाद्यांनी मोठा हल्ला घडवून आणला. हा आत्मघातकी हल्ला असल्याचे स्पष्ट झाले आहे. संपूर्ण शहरात भय आणि दहशतीच वातावरण आहे. तहरीक ए जिहाद (Tehreeq-E-Jihad) पाकिस्तानने या दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी घेतली असून रात्री २ वाजेच्या सुमारास हा हल्ला झाला असल्याचे समजत आहे.

- Advertisement -

या हल्ल्यात अनेक पाकिस्तानी सैनिक आणि पायलट यांचा या हल्ल्यात मृत्यू झाला आहे. या दहशतवाद्यांनी पाकिस्तानी एअर फोर्सची तीन फायटर जेट्स जाळली आहेत. याचा व्हिडिओही समोर आला आहे. एअरबेसच्या आत प्रचंड आग आणि धुर दिसत आहे. आत्मघातकी हल्लेखोर शिडीवरून तिथे घुसले आणि त्यानंतर त्यांनी हल्ला सुरू केला. एकामागोमाग एक असे अनेक बॉम्बस्फोटाचे आवाजही ऐकायला आले आहेत. याबाबत पाकिस्तानी लष्कराने अद्याप कोणतेही वक्तव्य जारी केलेले नाही.

दरम्यान, तालिबानशी संबंधित असलेल्या तेहरिक-ए-जिहाद दहशतवादी गटाने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारल्याचे वृत्त आहे. हल्लेखोरांचा खात्मा करण्यात आला असून क्लिअरन्स ऑपरेशन सुरू आहे, असे वृत्तात म्हटले आहे. या हल्ल्यात हवाई दलाच्या तळाच्या आत उभी असलेली अनेक विमाने उद्ध्वस्त झाली आहेत. वित्तहानी झाली असली तरीही हा दहशतवादी हल्ला अपयशी ठरला असल्याचं पाकिस्तानी लष्कराने म्हटलं आहे.

एअरबेसवरच्या या हल्ल्यानंतर आस-पासच्या भागात हाय अलर्ट देण्यात आलाय. आसापासचे शाळा-कॉलेजेस बंद करण्यात आले आहेत. दहशतवाद्यांना शोधून काढण्यासाठी मोठ्या प्रमाणात सर्च ऑपरेशन सुरु आहे. खबरदारी म्हणून पाकिस्तानच्या सर्व एअर बेसवर अलर्ट जारी करण्यात आलाय.

‘देशदूत’ / ‘सार्वमत’चे व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या