Tuesday, March 25, 2025
Homeनाशिकलोखंडी कमानीचे साहित्य चोरीचा डाव फसला

लोखंडी कमानीचे साहित्य चोरीचा डाव फसला

नाशिक | प्रतिनिधी Nashik

नाशिक महापालिकेने जुने सिडकोच्या प्रवेशाद्वार असलेल्या लेखानगर चौकात स्वागत कमान आणि दिशादर्शक फलक उभारण्यासाठी ८० लाख रुपयांहून अधिक तरतूद गेल्या ५ ते सहा वर्षांपूर्वी केली होती. त्यानुसार या ठिकाणी अवजड आणि हजारो किलो वजन असलेल्या लोखंडी कमानीचे भाग आणून टाकण्यात आले होते. त्याची रक्कम नाशिक महापालिकेने अदा केल्याचेही अंदाज पत्रकात दर्शविण्यात आले आहे.

- Advertisement -

शुक्रवारी, अचानक अज्ञात व्यक्तींनी गॅस कटरच्या मदतीने या कमानीचे तुकडे कापून हे साहित्य आयशर कंपनीच्या ट्रक क्रमांक MH-46-F-5126 (एमएच-४६ एफ ५१२६) ने पळविण्याचा प्रयत्नात होते. शिवसेना महानगरप्रमुख आणि जुने सिडकोतील माजी नगरसेवक प्रविण (बंटी) तिदमे हे लेखानगर येथून जात असतांना त्यांना ही बाब लक्षात आले. त्यांनी तातडीने त्या अज्ञात व्यक्तींना विरोध केला. प्रविण (बंटी) तिदमे यांच्या विरोधामुळे या चोरट्यांच्या टोळीने धूम ठोकली.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Sanjay Raut : “२०१४ मध्ये युती तोडण्यास…”; राऊतांनी फडणवीसांची बाजू घेत...

0
नाशिक | Nashik महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics) मागील दशकभरात अनेक मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. दोन दशकांहून अधिक काळ सोबती असलेल्या भाजप आणि शिवसेना (BJP and...