Monday, May 27, 2024
Homeधुळेप्रियकरासह तिघांच्या मदतीने काढला पतीचा काटा

प्रियकरासह तिघांच्या मदतीने काढला पतीचा काटा

धुळे । dhule प्रतिनिधी

कानून कें हाथ लंबे होते है… ही म्हण केवळ चित्रपटांसाठी मर्यादीत न राहता त्याची प्रचिती धुळेकरांना आली आहे. कुठलेही पुरावे नसतांना आपले कौशल्यपणाला लावून स्थानिक गुन्हे शाखा (Local Crime Branch)आणि थाळनेर पोलिसांनी (Thalner Police) शिरपूर तालुक्यातील तरडी शिवारातील खुनाचा छडा (Murder stick) लावला. पत्नीनेच (Wife) प्रियकरासह (boyfriend) तिघांच्या मदतीनेच पतीचा काटा (husband’s thorn) काढला. महिलेसह तिघांना पोरबंदरमधून तर एकास होळनांथेतून अटक करण्यात आली. त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे.

- Advertisement -

दरम्यान या उत्कृष्ठ तपासाबद्दल एलसीबी आणि थाळनेर पोलिस पथकाचे आयजींनी विशेष कौतूक केले. तर पोलिस अधिक्षक संजय बारकुंड यांनी दहा हजारांचे रिवार्ड जाहिर करीत याचा अहवाल राज्यस्तरावरील बक्षिसासाठी पाठविणार असल्याची माहिती त्यांनी पत्रपरिषदेत दिली.

शिरपूर तालुक्यातील तरडी येथील गोविंद हिरालाल परदेशी यांच्या मक्याच्या शेतात दि. 24 फेब्रुवारी रोजी दुपारी अनोळखी इसमाचा मृतदेह आढळून आला होता. मृतदेहाचे दोन्ही हात ओढणीने पाठीमागे बांधून त्याच ओढणीने त्याचा गळा आवळलेला होता. याप्रकरणी थाळनेर पोलिसात अज्ञात आरोपीवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. दरम्यान मृतदेह कुजलेला असल्यामुळे त्याची ओळख पटविण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर होते.

एका तिकिटावरून तपासाला गती-

मृतदेहाच्या हातावर केवळ मुकेश नाव गोंदलेले होते. त्याच्या खिशात शिरपूर-चोपड्याचे एसटीचे तिकीट मिळून आले. दि.26 फेब्रुवारीच्या या तिकीटावर दोन जणांनी प्रवास केल्याचे आढळून आले. परंतू खूनाची घटना 24 रोजी उघड झालेली असताना 26 फेब्रुवारीच्या प्रवासाचे तिकीट कसे? हा प्रश्न पोलिस पथकाने पडला. त्यांनी चोपडा-शिरपूर बस वाहकाशी संपर्क साधला. त्याने हे तिकिट दि.19 चे असून चुकून दि.26 तारीख टाकल्याचे सांगितले. त्यानंतर पोलिस पथकाने शिरपूर चोपडा दरम्यानचे सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरु केली. तीन सीसीटीव्ही फुटेजमध्ये मृत तरुण आणि एक महिला दिसली.

एका हॉटेलमध्ये देखील ही महिला गेल्याचे सीसीटीव्हीत आढळून आले. यासह घटनास्थळावरुन मिळून आलेले भौतिक पुरावे आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांनी मयताची ओळख पटविली. तसेच संशयीत आरोपींची नावेही निष्पन्न केली. मृताचे नाव मुकेश राजाराम बारेला (वय 30 रा. चाचर्‍या, ता. सेंधवा, जि. बडवाणी) असल्याचे स्पष्ट झाले. सध्या तो होळनांथे शिवारात रहात असल्याचेही समजले.

पोटच्या मुलाचा केला खून, आईसह भाच्याला झाली जन्मठेप

पोरबंदरमधून तिघांना अटक

एलसीबी आणि थाळनेर पोलिसांनी मुकेशची पत्नी मंगला मुकेश बारेला, तिचा प्रियकर सुशील उर्फ मुसल्या जयराम पावरा (वय 30 रा. होळनांथे) आणि त्याचे साथीदार दिनेश उर्फ गोल्या वासुदेव काळी (वय 19 रा. होळनांथे), जितू उर्फ टुंगर्‍या लकड्या पावरा (वय 20 रा. होळनांथे) यांना पोरबंद (गुजरात) व त्यातील एकाला होळनांथे येथून ताब्यात घेतले. त्यांनी गुन्ह्याची कबूली दिली आहे.

त्रास देत असल्याने प्रियकरासोबत

मयत मुकेश हा त्रास देत असल्यामुळे त्याला पत्नी मंगला हीने दोन वषापूर्वीच सोडले. त्यानंतर तिने गावातीलच प्रियकर सुशिल पावरा त्याच्यासोबत संसार थाटला. दरम्यान तिची दोन्ही मुले मुकेशकडेच होती. त्यांच्यासाठी ती अधून-मधून मुकेशच्या संपर्कात होती. पंरतू वडील मारतात, माझ्याकडे चुकीच्या नजरेने पाहतात, अशी तक्रार मुलीने मंगला बारेला हिच्याकडे केली होती. त्रासाला वैतागून मंगला हिने प्रियकरासह मुकेशच्या खुनाचा कट रचला.

जिल्हाधिकारी अन् ठाकरे गटाच्या पदाधिकार्‍यांमध्ये झाला शाब्दीक वाद…अन तरुणीसह दोघांवर दाखल झाला गुन्हा

असा केला खून

मंगला हिने मुकेशला विश्वासात घेतले. त्याला आत्याच्या घरी ये असा निरोप पाठविता. त्यानंतर मंगला आणि मुकेश हे दोघे चोपडा-शिरपूर बसने प्रवास करत आले. आत्याच्या घराकडे जात असताना वाटेत तरडी शिवारात तिने दुसरा प्रियकर सुशिल व त्याच्या दोन साथीदारांना बोलवून घेतले. या तिघांच्या मदतीने मुकेशचा ओढणीच्या सहाय्याने गळा आवळला. तसेच हातही बांधले. त्यानंतर मृतदेह मक्याच्या शेतात मधोमध टाकून दिला. दि. 19 फेब्रुवारी रोजी ही घटना घडली. मात्र, मृतदेह कुजल्यानंतर दुर्गंधी सुरू झाल्यानंतर दि. 24 फेब्रुवारी रोजी मृतदेह आढळून आला.

वाळूच्या भरधाव ट्रॅक्टरने बैलगाडीला दिली धडकगद्दारांना जागा दाखविण्याची आली वेळ!

या पथकाची कामगिरी, दहा हजारांचा रिवार्ड जाहिर

अत्यंत क्लिष्ट अशा या गुन्ह्याचा पोलिसांनी अवघ्या चार दिवसात यशस्वी तपास केला. याबद्दल पोलिस अधिक्षक संजय बारकुंड यांनी एलसीबी आणि थाळनेर पोलिसांचे विशेष कौतूक केले. तसेच त्यांना दहा हजारांचे रिवार्डही जाहिर केले. ही कामगिरी पोलीस अधीक्षक संजय बारकुंड, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे, उपविभागीय अधिकारी अन्साराम आगरकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, सपोनि उमेश बोरसे, पोसई बाळासाहेब सूर्यवंशी, पोसई कृष्णा पाटील, असई संजय पाटील, पोहेकॉ प्रभाकर बैसाणे, श्रीकांत पाटील, रवींद्र माळी, पोना. मायूस सोनवणे, पोशि अमोल जाधव, सुनील पाटील, महेंद्र सपकाळ, किशोर पाटील, योगेश जगताप, योगेश साळवे, योगेश ठाकूर, चालक कैलास महाजन, थाळनेर पोलीस ठाण्याचे असई किशोर चव्हाण, रफिक शेख, पोहेकॉ. शाम वळवी संजय धनगर, पोना भूषण रामोळे, ललीत खळगे, मनोज पाटील, दत्तू अहिरे, सिराज खाटीक, योगेश दाभाडे, धनराज मालचे, भटू साळुंखे, चालक हेकॉ. पगार व पोशि दिलीप मोरे यांनी केली.ं

- Advertisment -

ताज्या बातम्या