Tuesday, April 1, 2025
Homeधुळेतावखेडा फाट्याजवळ बर्निंग कारचा थरार

तावखेडा फाट्याजवळ बर्निंग कारचा थरार

दोंडाईचा । श. प्र.

निमगूळ ता. शिंदखेडा रस्त्यावरील तावखेडा फाट्यालगत दि. 1 रोज जुलै रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास हुंडाई कंपनीची आयटेन चारचाकी कारचा बर्निंग थरार पाहायला मिळाला. यात संपूर्ण कारचा कोळसा झाला. दोंडाईचा अग्निशमन दलाने आग आटोक्यात आणली. मात्र कारला आग लागल्याचे समजताच चालक कार सोडून घटनास्थळावरून पळून गेला होता. दोंडाईचा पोलीस व अग्निशमन दलाच्या जवानांनी सतर्कता दाखवत ही आग पूर्णपणे विझवली. मात्र कार पूर्ण जळून खाक झाली होती.

- Advertisement -

दोंडाईचा निमगूळ रस्ताच्या दरम्यान तावखेडा फाट्याजवळ निमगूळकडून दोंडाईचाकडे येणार्‍या होंडाई कंपनी आयटेन चारचाकी वाहन क्रमांक एमएच 15 डीसी 4694 ला आग लागल्याचे समजताच चालक कार रस्त्यावर सोडून पळून गेला. कारने पेट घेतल्याचे लक्षात आल्यावर रस्त्यावरील जाणार्‍या नागरिकांनी दोंडाईचा पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर दोंडाईचा पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली. नगर परिषदेच्या अग्निशमन दलाचे जवान बंब घेऊन घटनास्थळी दाखल झाले. तोपर्यंत आगीने रौद्ररूप धारण केले होते. संपूर्ण कार आगीच्या ज्वालानी वेढलेली होती. अग्निशमन दलाचे जवान सुनील सोलंकी, शिवा सोलंकी, चंदू राखपसरे यांनी आग आटोक्यात आणली. घटनेचे गांभीर्य ओळखत घटनास्थळी दोंडाईचा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार हे आग आटोक्यात आणल्यापर्यंत घटनास्थळी उपस्थित होते.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

जुने वाहन मोडीत काढल्यास मिळणार कर सवलत

0
मुंबई | प्रतिनिधी Mumbai स्वेच्छेने वाहन मोडीत (स्क्रॅप) काढणाऱ्या वाहनधारकांना पुन्हा त्याचप्रकारचे नवीन वाहन खरेदी करताना १५ टक्के कर सवलत देण्याचा महत्वपूर्ण निर्णय मंगळवारी झालेल्या...