नवी दिल्ली | New Delhi
पश्चिम बंगालमध्ये (West Bengal) एका १२ वर्षाच्या मुलाच्या दक्षतेमुळे रेल्वेचा मोठा अपघात टळला (Big Train Accident Prevented) आहे. पश्चिम बंगालमध्ये रेल्वेचा ट्रक खराब झाला होता आणि ट्रेन वेगात पुढे जात होती, तिथे असणाऱ्या एका मुलाने ट्रक खराब असल्याचे पाहिले आणि आपला लाल शर्ट काढला आणि फिरवू लगाला. समोर दिसलेले लाल कपड पाहून लोको पायलटने इमर्जन्सी ब्रेक लावला, त्यामुळे मोठा अपघात टळला आहे.
पश्चिम बंगालच्या मालदा जिल्ह्यात हा प्रकार घडला. मुरसलीन शेख या १२ वर्षीय मुलाने हा ट्रॅक पाहिला आणि त्याला धोक्याचा अंदाज आला. त्याने अंगातील लाल शर्ट काढला आणि ट्रॅकवर उभा राहून त्याने समोरून येणाऱ्या एक्सप्रेसला लाल शर्ट दाखवला. लोको पायलटने याचा सिग्नल पकडला. आणि योग्य ठिकाणी ट्रेन रोखण्यासाठी एमर्जन्सी ब्रेक लावला. गुरुवारी भालुका रोड यार्ड येथे ही घटना घडली आहे.
Onion Issue News : मुबंईतील बैठकीत कांद्याच्या प्रश्नावर तोडगा नाहीच! वाचा नेमकं आज काय झालं?
ईशान्य सीमा रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सब्यसाची डे म्हणाले, “एका १२ वर्षांच्या मुलाने मालदा ट्रेन थांबवण्यासाठी त्याने लाल शर्ट फिरवला, त्यामुळे लोको पायलटने इमर्जन्सी ब्रेक लावला आणि पॅसेंजर ट्रेन थांबवली. मुसळधार पावसामुळे रेल्वे ट्रॅक खराब झाल्यामुळे मुलाने हे केले.
पावसामुळे रेल्वे ट्रॅकवरील माती आणि खडे वाहून गेले होते. त्या ठिकाणी पोरीयनचे नुकसान झाल्याचे सांगण्यात येत आहे. अधिकारी म्हणाले, “नजीकच्या गावातील एका स्थलांतरित कामगाराचा मुलगा मुरसलीन शेख हा देखील रेल्वे कर्मचाऱ्यांसह यार्डात उपस्थित होता. पावसामुळे रुळाखालील भाग खराब झालेले पाहून त्या मुलाने समजूतदारपणा आणि सावधगीरी दाखवली. येणाऱ्या पॅसेंजर ट्रेनच्या समोर त्याला लाल शर्ट फिरवला यामुळे लोको पायलटने ट्रेन थांबवली.
“मोदी चुकीचं बोलत आहेत, मी मुख्यमंत्री असताना…”; शरद पवारांनी सगळा इतिहासच काढला
दरम्यान, या रेल्वे ट्रॅकच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले असून या मुलाच्या सतर्कतेबद्दल त्याला शौर्य पुरस्कार आणि रोख रक्कम देऊन गौरवण्यात आले आहे. त्याला प्रमाणपत्रही देण्यात आले आहे. या मुलाच्या घरी जाऊन त्याचा सन्मान करण्यात आला.