Monday, May 27, 2024
Homeजळगावजळगावातील ट्रान्सपोर्ट नगरातून ट्रक लांबवला

जळगावातील ट्रान्सपोर्ट नगरातून ट्रक लांबवला

जळगाव | प्रतिनिधी Jalgaon

ट्रान्सपोर्टनगरात लावलेली ट्रक चोरट्यांनी ११ रोजी सायंकाळी ६ ते ८.२० वाजेच्या सुमारास लांबवली. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

- Advertisement -

यासंदर्भात ट्रकचालक अफजल अब्बू खान (वय ५०, रामोशी वाडा, वडाळा गाव, नाशिक) यांनी फिर्याद दिली आहे.

ते नूर मोहम्मद (वडाळा गाव, नाशिक) यांच्या ट्रक (क्र.एमएच ४१ जी ५५३४) वर चालक म्हणून कामाला आहे. त्यांनी ट्रकमध्ये युरिया खत भरुन ते चोपड्यात उतरविले. त्यानंतर ते ट्रक घेवून जळगावातील ट्रान्सपोर्टनगरात गेले. त्यांनी ट्रक खुशी ट्रान्सपोर्ट येथे लावला. त्यानंतर ते बाजूला जेवण करण्यासाठी गेले.

जेवण झाल्यानंतर ते ट्रक लावल्या ठिकाणी गेले. परंतु, त्यांचा चार लाख रुपये किमतीचा ट्रक त्या ठिकाणी आढळला नाही. त्यामुळे ट्रकचालकांनी फिर्याद दिली. त्यावरुन एमआयडीसी पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या