Friday, April 25, 2025
Homeब्रेकिंग न्यूजAccident : रिक्षावर ट्रक उलटला; तिघांचा मृत्यू

Accident : रिक्षावर ट्रक उलटला; तिघांचा मृत्यू

मालेगाव । प्रतिनिधी Malegaon

सुताच्या थैल्यांनी भरलेला भरधाव ट्रक दुभाजकावर धडकून उभ्या असलेल्या रिक्षावर तसेच दुचाकीवर जाऊन उलटला. या अपघातात रिक्षा चालकासह वैद्यकिय महाविद्यालयाच्या दोन विद्यार्थीनी चिरडल्या जावून जागीच ठार झाल्या तर दोन विद्यार्थीनी गंभीररित्या जखमी झाल्या आहेत. मुंबई-आग्रा महामार्गावर दरेगाव येथील सर्व्हिस रोडवर आज सकाळी 11 वाजेच्या सुमारास ही घटना घडली.

- Advertisement -

अपघातग्रस्त ट्रक क्रेनच्या सहाय्याने उचलण्यात आल्यानंतर रिक्षातील जखमी व मृतांना बाहेर काढता आले. विरुद्ध दिशेने घुसलेल्या ओव्हरलोड ट्रकवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने ही घटना घडल्याचे सांगत संतप्त नागरीकांनी शहरात ओव्हरलोड असलेल्या वाहनांना बंदी घालण्याची मागणी केली आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

चिखलओहोळ शिवारात असलेल्या वैद्यकिय महाविद्यालयात शिक्षण घेणार्‍या सभा कौसर युनूस (20) व अलकामा मुक्तार (20, दोन्ही रा. दरेगाव) व अन्य दोन अशा चौघा विद्यार्थीनींना रिक्षा क्र. एम.एच.-41-ए.टी.-1671 मधून रिक्षाचालक कलाम मन्नान मन्सुरी (45) हा चिखलओहोळ शिवारात असलेल्या महाविद्यालयात महामार्गावर असलेल्या दरेगाव येथील सर्व्हिसरोडवरून घेवून जात होता.

सकाळी 11 वाजेच्या सुमारास सर्व्हिस रोडवर सुताचे थैले भरलेला मालट्रक क्र. टी.एन.-88-ए-6677 हा विरूध्द दिशेने घुसून वेगाने येत होता. सदर ट्रक सुताचे थैले मोठ्या प्रमाणात भरण्यात आल्याने एका बाजुने कलला होता. वेगामुळे ट्रक चालकाचे नियंत्रण सुटल्याचे निदर्शनास आल्याने रिक्षा व त्याच्यालगत एका दुचाकीस्वाराने आपली दुचाकी दुर्घटना टळावी म्हणून थांबवली. मात्र भरधाव असलेल्या ट्रकने दुभाजकाला धडक देत हा ट्रक उलटून रिक्षा व दुचाकीवर जावून उलटला.

सुताच्या थैलांचे वजन मोठ्या प्रमाणात असल्याने ट्रकखाली रिक्षा व दुचाकी दबली जावून त्यांचा अक्षरश: चुराडा झाला. दुचाकीस्वाराने ट्रक उलटत असल्याचे पाहताच आपल्या आईसह खाली उडी मारल्याने ते दोन्ही बचावले मात्र रिक्षामध्ये बसलेल्या सभा कौसर व अलकामा मुक्तार यासह अन्य दोन विद्यार्थीनी व रिक्षा चालकाला उतरणे शक्य न झाल्याने ते ट्रकखाली दबले गेले तर ट्रकमधील सुताचे थैले रस्त्यावर विखुरले गेले. अपघातग्रस्त ट्रकने बसला देखील कट मारला मात्र सुदैवाने चालकाने बस नियंत्रणात ठेवत पुढे नेल्याने बसमधील प्रवाशी बचावल्याचे घटना बघणार्‍यांनी सांगितले.

ट्रक उलटून त्याखाली रिक्षा दाबली गेल्याचे निदर्शनास येताच परिसरातील नागरीकांनी घटनास्थळी धाव घेत महामार्ग सहाय्यक केंद्रास दुरध्वनी केला. मात्र सदर वाहनासह पोलीस देखील घटनास्थळी उशीरा दाखल झाले. सुताच्या थैल्यांमुळे ट्रक हलविणे अशक्य असल्याने तातडीने क्रेनला पाचारण करण्यात येवून ट्रक उचलण्यात येवून रिक्षामध्ये दबलेल्यांना तातडीने बाहेर काढत नागरीकांनी सामान्य रूग्णालयात उपचारासाठी हलविले. मात्र गंभीररित्या जखमी झालेल्या रिक्षाचालक कलाम मन्सुरीसह सभा कौसर व अल्लमा मुक्तार या विद्यार्थीनींचा घटनास्थळीच मृत्यू झाल्याचे वैद्यकिय अधिकारी परवेज फैजी यांनी सांगितले. तर गंभीर जखमी असलेल्या दोघा विद्यार्थीनींना तातडीने खाजगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

या अपघाताची माहिती मिळताच आमदार मौलाना मुफ्ती मो. इस्माईल, माजी आमदार आसिफ शेख रशीद यांच्यासह विविध पक्षाचे पदाधिकारी व नागरीकांनी घटनास्थळी धाव घेत मदत कार्यास सहाय्य केले.

गोदाम शहराबाहेर हलवा : माजी आमदार आसिफ शेख
यंत्रमागाचे शहर असल्याने सुताचे थैले व इतर साहित्य शहरात येत असतात. मात्र अन्य शहरात सुत असो इतर साहित्य ठेवण्यासाठी शहराबाहेर वेअर हाऊसमध्ये गोदामात हे साहित्य ठेवले जाते. त्यामुळे मालट्रक शहरात येत नाही. परंतू मालेगावात हे ट्रक शहरात येत असतात लहान रस्त्यांवरच ते उभे असल्याने वाहतूक कोंडी होण्यासह अपघाताच्या घटना देखील घडतात. वाहतूक नियमांचे पालन या ट्रकतर्फे होत नाही व त्यांच्यावर कारवाई देखील प्रशासनातर्फे केली जात नसल्याने आजच्या घटनेस पोलीस, मनपा व प्रादेशिक परिवहन विभागाचे अधिकारी जबाबदार असल्याचा आरोप माजी आमदार आसिफ शेख यांनी पत्रकारांशी बोलतांना केला.

चिखलओहोळ शिवारातील वैद्यकिय महाविद्यालयात विद्यार्थीनींना घेवून जात असलेल्या रिक्षावर ट्रक उलटल्याने रिक्षा चालकासह दोघा विद्यार्थीनींचा मृत्यू झाला तर दोन विद्यार्थीनी जखमी झाले आहेत. ओव्हरलोड असलेल्या वाहनांवर कारवाई होत नसल्याने अशा घटना घडत आहेत. डॉक्टर होण्याचे स्वप्न बघणार्‍या विद्यार्थीनींच्या मृत्यूने कुटूंबाचा होत असलेला आक्रोश मन हेलावून सोडणारा होता. या घटनेची गंभीर दखल घेत शहरात ओव्हरलोड वाहने येणार नाहीत याची दक्षता संबंधित विभागाने घेतली पाहिजे.
आमदार मौलाना मुफ्ती इस्माईल

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

अजित

Ajit Pawar: अजित दादांनी केला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या ‘मी पुन्हा येईन’...

0
पुणे | Pune मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पुस्तक लिहायला सांगणार असल्याचे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. अजित पवार यांच्या हस्ते आज पुण्यात राज्य कुटुंब कल्याण भवन...