Thursday, March 27, 2025
Homeनाशिकपिकअपची दुचाकीस धडक; पिता-पुत्राचा मृत्यू

पिकअपची दुचाकीस धडक; पिता-पुत्राचा मृत्यू

मालेगाव । प्रतिनिधी Malegaon

- Advertisement -

भरधाव पिकअपने दुचाकीस धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वार पिता-पुत्र ठार झाले. मुंबई-आग्रा महामार्गावरील सवंदगाव फाट्यावर सकाळी सात वाजेच्या सुमारास घडलेल्या या घटनेने शहरात शोककळा पसरली आहे.

माजी नगरसेवक व शिक्षण मंडळाचे माजी सभापती शेख निसार शेख अकबर ऊर्फ राशनवाले (55) व त्यांचा मुलगा शेख अबरार (20) हे दोघे पिता-पुत्र दुचाकीने पहाटेची नमाज पठण केल्यानंतर सवंदगाव फाट्यावरून मुंबई-आग्रा महामार्गाने घराकडे जात होते. यावेळी भरधाव पिकअप (क्र. एमएच 48-सीबी-8663) ने शेख यांच्या दुचाकीला जोरात धडक दिल्याने दुचाकी फेकली जाऊन रस्त्यावर आदळलेल्या निसार शेख यांच्या डोक्यास मोठ्या प्रमाणात दुखापत झाल्याने ते जागीच ठार झाले, तर मुलगा अबरार गंभीररीत्या जखमी झाला. जखमी अवस्थेतदेखील अबरारने वडिलांच्या मोबाईलवरून कुटुंबियांशी संपर्क साधत अपघात झाल्याची माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच कुटुंबीय व परिसरातील नागरिकांनी जखमी अबरारला खासगी रुग्णालयात दाखल केले असता उपचार सुरू असताना त्याचेदेखील प्राणोत्क्रमण झाले.

दररोज पहाटे नमाजनंतर दोघे पिता-पुत्र फिरण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी जात होते. मोहरमच्या दिवशी काळाने त्यांच्यावर झडप घातल्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. दोघांवर येथील बडा कब्रस्तानात दफनविधी पार पडला. यावेळी शहरातील सामाजिक, शैक्षणिक व राजकीय क्षेत्रातील नागरिक उपस्थित होते.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Maharashtra Politics : “… तर आदित्य ठाकरेंना अटकही होऊ शकते”; शिंदेंच्या...

0
मुंबई | Mumbai यंदाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात (Budget Session) दिशा सालियन मृत्यू (Disha Salian Murder Case) प्रकरण चांगलेच गाजले. आधी दिशाने आत्महत्या केल्याचा दावा करण्यात...