Saturday, July 27, 2024
Homeमुख्य बातम्याकेंद्र सरकारची मोठी भेट; देशातील 'इतक्या' शहरांमध्ये धावणार इलेक्ट्रिक बस

केंद्र सरकारची मोठी भेट; देशातील ‘इतक्या’ शहरांमध्ये धावणार इलेक्ट्रिक बस

नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi

केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने (Modi Government) मोठा निर्णय घेतला आहे. पुढील काळात १०० शहरांमध्ये १०,००० हून अधिक इलेक्ट्रिक बसेस (Electric Buses) धावतील. यासाठी केंद्र सरकार निधी देणार आहे. या योजनेला पीएम-ई बस (PM E-Bus) असे नाव देण्यात आल्याची माहिती केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर (Anurag Thakur) यांनी पत्रकार परिषदेत दिली.

- Advertisement -

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या निर्णयांवर केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर म्हणाले की, पीएम ई-बस सेवेला मंजुरी देण्यात आली आहे. या योजनेसाठी ५०,००० कोटीहून अधिक रुपये खर्च करण्यात येणार आहेत. पीएम ई-बस सेवेमध्ये देशभरात सुमारे १०,००० नवीन इलेक्ट्रिक बसेस उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

ई-बस सेवेसाठी केंद्र सरकार २०,००० कोटी रुपये देणार आहे, तर उर्वरित रक्कम राज्य सरकार देणार आहे. ही बस पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपमधून चालवली जाणार आहे. बससेवेसाठी सात हजार कोटी रुपयांचे कर्जही घेतले जाणार असल्याचे अनुराग ठाकूर यांनी सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने देशभरातील बस सेवेचा आणखी विस्तार करण्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे. बस सेवा वाढवण्यासाठी पीएम ई-बस सेवा (PM-eBus Sewa) योजनेला मंजुरी देण्यात आली आहे.

ही बससेवा देशभरात १६९ शहरांमध्ये विस्तारली जाईल. यामध्ये १०,००० ई-बस नागरिकांच्या सेवेत दाखल होतील, अशी माहिती केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत दिली. यामुळे अनेक नोकरीच्या संधीही उपलब्ध होतील, असेही त्यांनी सांगितले.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

- Advertisment -

ताज्या बातम्या