Saturday, May 4, 2024
Homeजळगावसाकेगावजवळील वाघुर नदी परिसराला ‘क’ वर्ग पर्यटन स्थळाचा दर्जा

साकेगावजवळील वाघुर नदी परिसराला ‘क’ वर्ग पर्यटन स्थळाचा दर्जा

भुसावळ (Bhusawal) प्रतिनिधी –

तालुक्यातील साकेगाव (Sakegaon) येथील वाघुर नदीचा (Waghur river) परिसर अथवा किनार्‍यावर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहाला लागून असलेल्या परिसराला (area) ‘क’ वर्ग (status of a ‘C’ class) पर्यटन स्थळाचा दर्जा (tourist destination) प्राप्त झाला आहे. जिल्हा नियोजन समिती सदस्य (District Planning Committee Member) तथा माजी जि.प. सदस्य रविंद्र नाना पाटील (Ravindra Nana Patil) यांनी यासंदर्भात मागणी करून सातत्याने पाठपुरावा केला होता.

- Advertisement -

याबाबत माहिती अशी की, साकेगाव ता. भुसावळ येथील वाघुर नदीचा ((Waghur river)) परिसर हा निसर्गरम्य असून हा परिसर विकसित झाल्यास निसर्गाची शोभा तर वाढणारच आहे, त्याचबरोबर परिसरातील बेरोजगार युवकांना (Unemployed youth) मोठ्या प्रमाणात रोजगार देखील उपलब्ध होणार आहे. तसेच गावाचे वैभव वाढणार आहे. येत्या काही कालावधीत शेळगाव बॅरेजचे काम पूर्णत्वास येत असल्याने साकेगावपर्यंत वाघूर नदीचे बॅकवॉटर येणार असून परिसर सुजलाम सुफलाम होणार आहे.
या परिसराला ‘क’ वर्ग (status of a ‘C’ class) पर्यटन स्थळाचा दर्जा (tourist destination) देण्यात यावा, अशी मागणी गेल्यावर्षी जिल्हा नियोजन समितीचे सदस्य तथा जिल्हा परिषद सदस्य रविंद्र नाना पाटील यांनी जिल्हा नियोजन समितीच्या सभेत केली होती. जिल्हाधिकारी तथा जिल्हा नियोजन समितीचे सचिव यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या सभेत साकेगाव येथील वाघुर नदीच्या परिसराला ‘क’ वर्ग पर्यटन स्थळास मान्यता देण्यात आली आहे. या संदर्भातील पत्र जिल्हा परिषद ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांनी रविंद्र नाना पाटील यांना दिले आहेत.
साकेगावजवळील वाघुर नदीचा परिसर सुशोभित झाल्यानंतर पर्यटकांसाठी एक आनंदाचा परिसर तयार होणार आहे. त्यामुळे साकेगावसह भुसावळ तालुक्याचे वैभव देखील वाढणार आहे. त्यामुळे परिसरातील ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

२५ कोटी रूपयांच्या निधीसाठी प्रयत्नशील – पाटील
साकेगावजवळील वाघुर नदी परिसराला ‘क’ वर्ग पर्यटन स्थळाचा दर्जा मिळाला असून या माध्यमातून भविष्यात तरुणांसाठी रोजगार उपलब्ध होणार आहे. तसेच तालुक्यातीलच नव्हे तर जिल्हाभरातील पर्यटकांसाठी एक उत्कृष्ट पर्यटन स्थळ तयार व्हावे यासाठी जिल्हा नियोजन समिती सदस्य तथा माजी जि. प. सदस्य रविंद्र पाटील यांनी पर्यटन विकास राज्यमंत्री अदिती तटकरे यांना निवेदन देऊन त्यांच्याशी नुकतीच चर्चा केली.

साकेगाव जवळील वाघुर नदी परिसरातील ‘क’ वर्ग पर्यटनस्थळाला २५ कोटी रूपयांचा निधी (Fund of Rs. 25 crores) उपलब्ध करून द्यावा अशी मागणी केली. उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy Chief Minister Ajit Pawar) व पर्यटन विकास राज्यमंत्री अदिती तटकरे (Minister of State for Tourism Aditi Tatkare) यांनी जिल्हाधिकारी यांना यासंदर्भातील प्रस्ताव सादर करावा, अशा सूचना दिल्या आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या