Saturday, May 4, 2024
Homeजळगावजुवाडी वनक्षेत्रातील धबधबा पर्यटकांना खुणावू लागलाय!

जुवाडी वनक्षेत्रातील धबधबा पर्यटकांना खुणावू लागलाय!

रविंद्र पाटील 

गुढे ता.भडगाव –

- Advertisement -

येथून जवळच असलेल्या जुवार्डी वनक्षेत्रातील डोंगर दरीतून वाहणाऱ्या पाण्याने नैसर्गिकरित्या निर्माण झालेला हा धबधबा यंदाच्या दुसऱ्याच पावसाने खळखळून वाहू लागला असून तो आता पर्यटकांना खुणावू लागल्याने परिसरातील पर्यटक, हौशी लोक हा धबधबा पाहण्यासाठी येऊ लागल्याने जुवाडीकरांना मोठा अभिमान वाटू लागला आहे.

गाव लोकांच्या नजरेआड असलेला हा नैसर्गिक धबधबा येथील वनक्षेतत्राचे सौदर्य फुलवितो आहे. जुवार्डी गावाजवळ काही अंतरावर मोठं नैसर्गिक वनक्षेत्र लाभलेलं आहे. तालुक्यातील जंगलातील हा एकमेव धबधबा प्रमुख आकर्षण मानला जातो.

याची उंची केवळ २५ ते ३० फुटा पर्यंत असून हा धबधबा नैसर्गिक आहे. यातील पाणी जुवार्डी धरण क्षेत्रातून पुढे गुढे मार्गे १० कि.मी. असलेल्या गिरणा नदीला जाऊन मिळते. पहिल्या दोन पावसाच्या पाण्याने हा धबधबा प्रवाहीत होऊन खळखळून वाहू लागला.

परिसरातील काही लोक हा धबधबा पाहण्यासाठी येथे येत असल्याने गर्दी दिसून येत आहे.  भडगाव तालुका पर्यटनाच्या दृष्टीने मागे आहे. येथील जंगलातील या नैसर्गिक कमी उंचीच्या धबधब्याचे आकर्षक छायाचित्रकारांना व युवकांना देखील मोठे भुरळ घालत आहे.

वन विभागाच्या नरजेआड दुर्लक्षीत हा नैसर्गिक धबधबा येथील वनक्षेत्राचे सौंदर्य खुलवत आहे. या सभोवती पर्यटन व वनविभागाच्या वतीने वन बगीचे व सुशोभिकरण झाल्यास या भागाला पर्यटनाच्या दृष्टीने अधिक महत्त्व निर्माण होऊन एक दिवशीय सहल निघू शकेल यासाठी लोकप्रतिनिधी व प्रशासनाने येथे लक्ष घालणे गरजेचे आहे. या जंगलात मोठी वनसंपदा आहे तसेच या जंगलात मोर, हरिण, ससे, रानडुक्कर, तडस, रुई प्राणी, नीलगाय, माकड

- Advertisment -

ताज्या बातम्या