Friday, November 8, 2024
Homeब्रेकिंग न्यूजनिफाड मतदारसंघात बदलाचे वारे

निफाड मतदारसंघात बदलाचे वारे

नको अण्णा, नको काका, आता हवा फक्त गुरुभाऊ!

निफाड । प्रतिनिधी Niphad

- Advertisement -

निफाड विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सामान्य जनतेमध्ये निवडणुकी- विषयी तेच तेच चेहरे व घराणेशाहीमुळे नागरिकांनी आता निफाड विधानसभेत बदलाचे वारे वाहू लागल्याची चिन्हे दिसायला लागली असल्याचे रिपब्लिकन काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष पांडुरंग पगारे यांनी प्रचारसभेत नागरिकांना संबोधित करताना सांगितले.

निवडणुका फक्त मोठ्या शहरांसाठी वा गावांसाठी धनदांडग्यांसाठीच आहे का? असा सवाल त्यांनी करत निफाड तालुक्यातील पश्चिम पट्ट्यातील ओझर, पिंपळगाव बसवंत व कसबे सुकेणे या मोठ्या शहरांना म्हणा की गावांना गत 45 वर्षांपासून आमदारकी लाभली आहे. त्यामुळे छोट्या गावांना संधी कधी म्हणा की तालुक्यातील पूर्व पट्ट्यातील राजकीय, सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्त्यांना कधी संधी मिळणार म्हणून प्रादेशिक समतोल साधण्यासाठी गोदाकाठ परिसरातील तामसवाडी गावचे भूमिपुत्र, निफाड पंचायत समिती व पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती गुरुदेव द्वारकानाथ कांदे या निवडणुकीत प्रहार जनशक्ती पक्षाकडून तसेच स्वराज पक्ष, सर्व अंगीकृत शेतकरी संघटना, रिपब्लिकन काँग्रेस पार्टी यांच्या परिवर्तन महाआघाडीकडून लढण्यासाठी उतरले आहेत.

कारण माजी आमदार अनिल कदम यांनी दहा वर्षे आमदार पदावर राहत तालुक्याची सेवा केली आहे. तर विद्यमान आमदार दिलीपराव बनकर यांनीही पाच पाच वर्षांच्या दोन टर्म सत्ता भोगत तालुक्याची सेवा केली आहे. त्यामुळे आता जनतेला अण्णा, काका नको, भाऊ हवा आहे. अर्थात सर्वसामान्य कुटुंबातील सर्वांना उपलब्ध होणारा, गोरगरीब सर्वसामान्यांच्या सुखदुःखात सहभागी होऊन सहज उपलब्ध होत त्यांची कामे मार्गी लावणारा उमेदवार हवा आहे. गाडीच्या काचा लावून एसीची हवा घेणारा व धनदांडग्यांसाठीच फक्त उपलब्ध असणारा तालुक्याचा आमदार नको आहे. त्यामुळेच उमेदवार गुरुदेव द्वारकानाथ कांदे यांना निफाड तालुक्यातील मतदारांची पसंती वाढत आहे.

निफाड विधानसभेचा भावी आमदार म्हणून गुरुदेव कांदे यांच्याकडे सर्वसामान्य जनता बघायला लागली आहे. अभी नही तो कभी नही या काव्यपंक्तीवर कार्यरत होऊन प्रहार जनशक्ती पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी, शेतकरी संघटनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी, स्वराज्य पक्षाच्या छत्रपतींना मानणार्‍या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी, रिपब्लिकन काँग्रेस पार्टीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी ही धनदांडगे विरुद्ध सर्वसामान्य लढाई आपली मानून गुरुदेव कांदे यांच्यासाठी तन-मन-धनाने या लोकशाहीच्या पवित्र उत्सवात सहभागी होऊन निफाडचा कांद्याचा प्रश्न असो की द्राक्षांचा, निफाड रानवड साखर कारखान्याचा प्रश्न असो, औद्योगिक वसाहतीचा, प्रलंबित उड्डाणपुलाचा असो की नांदूरमधमेश्वर पर्यटन स्थळ विकसित करण्याचा, असंघटित कामगारांना रोजगार उपलब्ध करण्यासाठी असो की नाशिक जिल्हा बँकेच्या वतीने तालुक्यातील सर्वसामान्य बळीराजाच्या जमिनीवर बोजा चढवण्याची जी मोगलाई सुरू आहे त्यासाठी असो हे सर्व थांबवण्यासाठी जनतेचा जनसेवक म्हणून निफाड तालुक्यातील जनतेने आता गुरुदेव कांदे यांच्या रूपात आपला जनसेवक बघितला आहे. त्यामुळे 20 तारखेला अण्णा नको, काका नको, हवा फक्त गुरुभाऊ हेच 23 तारखेच्या निफाड निवडणुकीच्या निकालावरून दिसणार आहे, असे पांडुरंग पगारे यांनी आपल्या भाषणात सांगितले.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या