Thursday, June 18, 2026
Homeब्रेकिंग न्यूजदिंडोरी नगराध्यक्ष पदासाठी बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा

दिंडोरी नगराध्यक्ष पदासाठी बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा

नगरसेविका आशा कराटेंचा एकमेव अर्ज दाखल

दिंडोरी । प्रतिनिधी Dindori

दिंडोरी नगरपंचायत नगराध्यक्षपदासाठी भाजप नगरसेविका आशा कराटे यांचा आज एकमेव एक अर्ज दाखल झाल्याने आशा कराटे यांचा नगराध्यक्षपदाचा मार्ग मोकळा झाला असून दि. 8 मे रोजी विशेष सभेत याबाबत अधिकृत निर्णय जाहीर केला जाईल.

- Advertisement -

दिंडोरी नगरपंचायत नगराध्यक्षा सुनीता लहांगे यांनी दिलेला पदाचा राजीनामा मंजूर झाल्यानंतर काल निवडणूक कार्यक्रम घोषित झाला होता. त्यानुसार आज भरण्याची शेवटची मुदत होती. त्यानुसार महायुतीच्या वतीने आशा कराटे यांचा अर्ज दाखल करण्यात आला.

यावेळी गटनेते अविनाश जाधव, नगरसेविका अरुणा देशमुख, निर्मला मवाळ, नगरसेवक नितीन गांगुर्डे, दिपक जाधव, सुजित मुरकूटे, माजी नगराध्यक्ष सचिन देशमुख, कैलास मवाळ, भाजप जिल्हा सरचिटणीस रणजित देशमुख, रमेश बोरस्ते, माधवराव सांळूखे, नितीन धिंदळे, संतोष गांगोडे यांच्या उपस्थितीत आशा कराटे यांनी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी संदीप चौधरी यांच्याकडे अर्ज दाखल केला. त्यांच्या अर्जाला सूचक नगरसेविका निर्मला कैलास मवाळ या होत्या तर अनुमोदक नगरसेविका अरुणा रणजीत देशमुख या होत्या.

दुपारी 2 वाजेपर्यंत आशा कराटे यांचेच नामनिर्देशन पत्र दाखल झाले. छाननीतही कराटे यांचा अर्ज वैध ठरला. दुसरा कुणाचाही अर्ज न आल्याने आशा कराटे यांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे. परंतू यावर दि. 8 मे रोजी नगरपंचायतीच्या विशेष सभेत शिक्कामोर्तब होईल.

ताज्या बातम्या

विजेच्या धक्क्याने तरुणाचा मृत्यू

0
दिंडोरी | प्रतिनिधी जानोरी येथे ३१ वर्षीय तरुणाचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. आकाश मच्छिंद्र सूर्यवंशी (३१, रा. मुखेड, ता. निफाड)...