चाळीसगाव chalisgaon प्रतिनिधी
शहरालगत असलेल्या खडकी बु, येथे घराबाहेर कचरा फेकण्यासाठी रोडावर आलेल्या ५५ वर्षीय महिलेल्या भरधाव पिकअप गाडीने उडवील्याने तिचा जागीच मृत्यू झाला. हि घटना दिवाळीच्या दिवशी संकाळी ६ वाजेच्या सुमारास घडल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
लताबाई मांडोळो रा.खडकी ब्रु, ह्या नेहमी प्रमाणे चाळीसगाव-नांदगाव महामार्गाच्या पलीकडे कचरा फेकण्यासाठी जात असताता, भरधाव येणार्या पांढर्या रंगाच्या पिकऍप गाडी(क्र.एमएम,१९,सीवाय ०१५७) ने त्याना जोरदार धडक दिली. यात त्याला गंभीर मार लागल्याने, त्यांचा जागेवरच मृत्यू झाला. याप्रकरणी चाळीसगाव पोलीस स्टेशनला गणेश सुरेश शिंदे रा. खडकी बु. यांच्या फिर्यादीवरुन पिक चालकाविरोधात गुन्हां दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी पिकसह चालकास ताब्यात घेतल्याची माहिती प्राप्त झाली आहे. पुढील तपास पोकॉ.भटु पाटील करीत आहेत.