Thursday, May 23, 2024
HomeUncategorizedऔरंगाबादमध्ये बाल कोविड रुग्णालयाचे काम अंतिम टप्प्यात

औरंगाबादमध्ये बाल कोविड रुग्णालयाचे काम अंतिम टप्प्यात

औरंगाबाद – Aurangabad

जिल्हा प्रशासन (District Administration) आणि गरवारे कंपनीच्या(Garware Company) बाल कोविड केअर सेंटरबाबत (Child Covid Care Center) सांमजस्य करार झाला. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिरकरणाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी सुनील चव्हाण (Collector Sunil Chavan) आणि गरवारे कंपनीचे संचालक एस. व्ही. आमलेकर यांनी करारावर स्वाक्षरी केल्या.

- Advertisement -

कोरोना संसर्गाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेत बालकांना कोरोनाचा अधिक धोका असल्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे. त्यामुळे शहरातील गरवारे कंपनीमध्ये बालकांसाठी कोविड केअर सेंटर उभे करण्यात आले आहे. या ठिकाणी बालकांसाठी स्वतंत्र चार विभाग, पाण्याची व्यवस्था, स्वतंत्र स्वच्छतागृह, 13 केएलचा लिक्विड ऑक्सिजन प्लांट, बालकांसाठी भिंतीवर चित्र, एलसीडी टीव्ही, 72 डॉक्टर, सीसीटीव्ही, कर्मचार्‍यांची नियुक्ती, औषधी व इतर साहित्य ठेवण्याकरिता स्वतंत्र रुम इत्यादी व्यवस्था करण्यात येत आहेत.

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने गरवारे कंपनीच्या मदतीने 125 बेडचे बाल कोविड रुग्णालय उभारणीचे काम हाती घेतलेले होते, आता ते चालवण्यासाठी पालिकेच्या ताब्यात दिले जाणार आहे. येथे शून्य ते अठरा वयोगटातील बालकांवर उपचार केले जाणार आहेत. गरवारे कंनीने अत्याधुनिक पद्धतीने बाल कोविड सेंटर उभारले आहे. या ठिकाणी बालकांसोबत एका पालकाची राहण्याची व्यवस्था केली आहे. सर्व सुविधांनी तयार होत असलेल्या या सुसज्ज अशा या बाल कोविड रुग्णालयाचे काम अंतिम टप्प्यात आलेले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या