Saturday, May 4, 2024
Homeनाशिकदेवमामलेदार स्मारकाचे काम नित्कृष्ट दर्जाचे

देवमामलेदार स्मारकाचे काम नित्कृष्ट दर्जाचे

सटाणा । प्रतिनिधी Satana

संपूर्ण राज्याचे लक्ष असलेल्या देवमामलेदार यशवंतराव महाराजांच्या (Devmamaledar Yashwantrao Maharaj) स्मारकाचे (Monument) काम निकृष्ट दर्जाचे (Poor quality) होत असुन या संदर्भात जिल्हाधिकार्‍यांनी तात्काळ दखल न घेतल्यास महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aaghadi) वतीने स्मारक परिसरात आमरण उपोषण (Aamaran Uposhan) करणार असल्याची माहिती माजी आमदार संजय चव्हाण (Former MLA Sanjay Chavan) यांनी दिली.

- Advertisement -

देवमामलेदार स्मारकाच्या कामात दर्जा नसल्याने शासनाने मंजूर केलेला सुमारे चार कोटी रुपयांचा निधी (fund) वाया जाण्याची शक्यता असून याबाबत महाविकास आघाडीचे पदाधिकारी जिल्हाधिकार्‍यांची भेट घेणार असल्याचे चव्हाण यांनी सांगितले.

फेब्रुवारी महिन्यात महाराजांच्या स्मारकाच्या कामाचे भुमिपूजन (Bhumipujan) राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांच्यासह पालकमंत्री छगन भुजबळ (Guardian Minister Chhagan Bhujbal), कृषीमंत्री दादा भुसे (Agriculture Minister Dada Bhuse), खा.डॉ. सुभाष भामरे, आ. दिलीप बोरसे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाल्यानंतर नऊ महिन्यात स्मारकाचे काम पुर्ण करून डिसेंबर महिन्यात होणार्‍या देवमामलेदार यशवंतराव महाराजांच्या महापुजेप्रसंगी स्मारक जनतेला बघण्यासाठी खुले केले जाईल, अशी घोषणा नगराध्यक्ष सुनिल मोरे यांनी केली होती.

सद्यस्थितीत स्मारकाच्या छतावरील जुने कौल व सागाच्या लाकडी कामावर रंगकाम होत आहे. महाराजांचे निवासस्थान असलेल्या जागेवर कोणतेही काम दर्जेदार होत नसून, असलेल्या कामावरच मलमपट्टी केली जात आहे. स्मारकाचे काम पुरातत्व जोपासून, तसेच कलाकुशल असलेल्या कारागिरांकडून होणे आवश्यक असतांना मर्जीतील ठेकेदाराला काम देण्यात आले असल्याचा आरोप चव्हाण यांनी केला.

स्मारकाच्या कामात देवस्थानला देखील विश्वासात घेतले जात नसून, मनमानी पध्दतीने होत असलेल्या कामाबद्दल, जिल्हाधिकार्‍यांनी दखल घेऊन स्मारकासाठी असलेला शासनाचा निधी, देवस्थानकडे वर्ग करण्याची मागणी यावेळी चव्हाण यांच्यासह काँग्रेसचे शहराध्यक्ष किशोर कदम, माजी नगराध्यक्ष विजयराज वाघ, पांडूरंग सोनवणे, माजी नगरसेवक मनोज सोनवणे आदिंसह महाविकास आघाडीच्या पदाधिकार्‍यांनी केली.

यावेळी उपस्थित पालिकेच्या सत्तेत सहभागी असलेले भाजपचे गटनेते महेश देवरे यांनी देखील महाविकास आघाडीच्या सुरात सूर मिळवून, स्मारकाच्या कामाबद्दल नाराजी व्यक्त केली. स्मारकाचे नित्कृष्ट दर्जाचे काम होत असल्याने कोट्यवधींचा निधी वाया जाणार असल्याचे देवरे यांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या