Monday, May 27, 2024
Homeमुख्य बातम्यास्मार्ट सिटी कंपनीचे वराती मागून घोडे

स्मार्ट सिटी कंपनीचे वराती मागून घोडे

नाशिक । प्रतिनिधी Nashik

स्मार्ट सिटी कंपनीचा ( Smart City Company ) नियोजनशून्य कारभार सुरूच असल्याचे दिसत आहे. सहसा पावसाळ्यात ( Rainy Season )कोणत्याही प्रकारे खोदकम होत नाही, असे असले तरी भर पावसाळ्यात स्मार्ट सिटी कंपनीकडून शहरातील वर्दळीच्या ठिकाणी थेट रस्ते खोदण्यात आल्यामुळे नागरिकांसाठी डोकेदुखीचा विषय ठरला आहे तर दुसरीकडे या खोदण्यात आलेल्या खड्ड्यांमध्ये पाणी साचल्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर देखील त्याचा परिणाम होणार आहे. नियोजन शून्य काम असल्याची प्रतिक्रिया नागरिक व्यक्त करीत आहे.

- Advertisement -

महापालिका आयुक्त तथा प्रशासक रमेश पवार यांनी 30 मे पर्यंत पावसाळी पूर्वीच सर्व कामे पुर्ण करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार महापालिकेच्या वतीने शहरात ज्या ज्या ठिकाणी कामे सुरू होती ती बंद करण्यात आली, तर जी कामे प्रगतीपथावर होती त्यांची डागडुजी करून लोकांसाठी खुली करण्यात आली. तर ज्या रस्त्याचे खोदकाम झाले होते मात्र त्याच्यावर डांबरीकरण झाले नव्हते अशा ठिकाणीदेखील डांबरीकरण करण्यात आले. जेणेकरून पावसाळ्यात नागरिकांना त्रास होणार नाही याची दक्षता घेण्यात आली, मात्र दुसरीकडे केंद्राचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या स्मार्ट सिटी कंपनीकडून नियोजनशून्य कारभार सुरूच असल्याचे दिसून येत आहे.

शहरातील महात्मा गांधी रोड यशवंत व्यायाम शाळा लगत रस्त्याच्या कडेला मोठ्या प्रमाणात खोदकाम सुरू झाले आहे तर बुधवारी आलेल्या जोरदार पावसामुळे त्यात संपूर्ण पाणी भरले होते. तर दुसरीकडे रेड क्रॉस सिग्नल या ठिकाणी देखील नियोजनशून्य कारभार सुरू असल्याचे दिसून येत आहे. या ठिकाणी खोदकाम करून त्यात पाइप टाकण्याचे काम सुरू होते. अशा पद्धतीने काम सुरू असल्यामुळे नागरिकांमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या