Monday, July 22, 2024
Homeनाशिकयेवला शिवसृष्टी प्रकल्पाचे काम लवकरच होणार पूर्ण; 'इतक्या' कोटींचा निधी मंजूर

येवला शिवसृष्टी प्रकल्पाचे काम लवकरच होणार पूर्ण; ‘इतक्या’ कोटींचा निधी मंजूर

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

- Advertisement -

राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ (Chhagan bhujbal) यांच्या प्रयत्नांतून येवला शिवसृष्टीच्या उर्वरित विकास कामांसाठी ५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आल्यामुळे येवला शिवसृष्टीचे सुरू असलेले काम लवकरच पूर्ण होणार असून येवल्याच्या वैभवात अधिक भर पडणार आहे.

मंत्री छगन भुजबळ यांच्या ड्रीम प्रोजेक्ट पैकी एक असलेल्या येवला शिवसृष्टी प्रकल्पासाठी जिल्हा नियोजन निधी अंतर्गत २ कोटी रुपये व प्रादेशिक पर्यटन विभागाकडून ४ कोटी असे एकूण ६ कोटीचा निधी या अगोदरच मंजूर करण्यात आला असून प्रकल्पाचे काम देखील सुरु आहे. या प्रकल्पासाठी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या रायगडावरील प्रतिकृती असलेल्या सिंहासनाधिष्टीत पुतळ्याचे काम कुडाळ येथे पूर्णत्वाच्या टप्प्यावर आहे.

विशेष म्हणजे महाराष्ट्र सदनात बसविण्यात आलेले पुतळे ज्या कारागिरांनी घडविले आहे त्यांच्याच हातून हा पुतळा बनविला जात आहे. आता या प्रकल्पातील उर्वारीत कामासाठी आता प्रादेशिक पर्यटन योजनेच्या माध्यमातून पुन्हा ५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून यातील राहिलेली कामे पूर्ण होऊन लवकरच हा शिवसृष्टी प्रकल्प पूर्ण होणार आहे.

येवला शिवसृष्टीमध्ये या कामांचा असेल समावेश

येवला शिवसृष्टी प्रकल्पात छत्रपती शिवाजी महाराजांचा रायगडावरील प्रतिकृती असलेला सिंहासनाधिष्टीत पुतळा, शिवछत्रपतींच्या जीवनावर आधारित म्युरल्स, आर.सी.सी गॅलरी, म्युझियम, कॅफेटेरीया, आर.सी.सी बुरुज, ओ.व्ही हॉल, पर्यटन सुविधा केंद्र, विक्री केंद्र, इतर अनुषंगिक पुतळे, स्वच्छतागृह, लॅडस्केपिंग, गार्डनिंग, पेंटीग्ज, पाणीपुरवठा, मलनिस्सारण प्रकल्प, आग्निप्रतिबंधक यंत्रणा, इलेक्ट्रीक कामे, सुशोभिकरणाची कामे या कामांचा समावेश असणार आहे.

‘देशदूत’ / ‘सार्वमत’चे व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या