Saturday, September 26, 2026
Homeक्राईमकुस्तीपटुची धारदार शस्राने वार करत अज्ञातांनी केली हत्या

कुस्तीपटुची धारदार शस्राने वार करत अज्ञातांनी केली हत्या

इगतपुरी | प्रतिनिधी
इगतपुरी तालुक्यातील सांजेगाव येथील तरुणाचा भर रस्त्यावर ऐन अक्षय्य तृतीयाच्या दिवशीच हत्या झाल्याची घटना घडली आहे. नाशिक – मुंबई आग्रा महामार्गावर राजूर फाटा येथे ही घटना घडली आहे. भुषण लहामगे असे इसमाचे नाव असून जिल्हास्तरीय कुस्तीपटू असल्याचे वृत्त आहे.

दुचाकीवर आलेल्या हल्लेखोरांनी या इसमावर सुरवातीला तीन ते चार राऊंड फायर केले त्यानंतर त्यांनी यावर न थांबता धारदार कोयत्याने ही सपासप वार केले. यानंतर, हे हल्लेखोर फरार झाल्याचे समजत आहे.

- Advertisement -

दरम्यान, वाडीवऱ्हे आणि ग्रामीण पोलीस दल घटनास्थळी दाखल झाल्यानंतर त्यांनी पंचनामा करून अज्ञात हल्लेखोरांना पकडण्यासाठी पथके रवाना केली आहेत. भर महामार्गावर खून झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली असून मारेकऱ्यांचा कसून शोध सुरू करण्यात आला आहे.

ताज्या बातम्या

राज्यात दुष्काळ जाहीर, महसुल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, दुष्काळग्रस्त तालुक्यांची संख्या…

0
मुंबई | Mumbaiराज्यातील दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. खरीप हंगाम २०२६ मध्ये ‘ट्रिगर-१’ लागू झालेल्या २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात...