Friday, April 25, 2025
Homeजळगावमोठ्या भावाच्या विजयासाठी लहान भावाने सांभाळली प्रचाराची धुरा

मोठ्या भावाच्या विजयासाठी लहान भावाने सांभाळली प्रचाराची धुरा

पाचोरा । प्रतिनिधी

माजी आमदार दिलीप भाऊ वाघ यांच्या प्रचारार्थ त्यांचे लहान बंधू व पाचोरा तालुका शिक्षण संस्थेचे चेअरमन संजय वाघ हे पाचोरा शहरातील विविध भागात जाऊन दिलीप वाघ यांच्या प्रचाराची धुरा सांभाळत आहेत. त्यांनी ग्रामीण भागात घरोघरी जाऊन मतदारसंघ पिंजून काढला आहे.

- Advertisement -

शहरातील विविध भागात जाऊन गृहभेटी घेऊन व कॉर्नरसभा घेऊन माजी आमदार दिलीप भाऊ वाघ यांना सहकार्य करण्याचे आवाहन करीत आहेत. नुकतीच त्यांनी हुसैनी चौक पिंजारवाडा येथे सभा घेऊन दिलीप भाऊ वाघ यांना निवडून देण्याचे आवाहन केले.
यावेळी रहीम बागवान सर, अजहर खान, खलील देशमुख, माजी नगरसेवक वासू महाजन, नासीर दादा मजीद, सईद दादा पंजाबी, जहांगीर दादा पिंजारी, सत्तार दादा पिंजारी, वसीम बागवान, सईद पंजाबी, साजिद कुरेशी, मोहसीन टकारी, तारिक सय्यद, अहसान भाई, इरफान बागवान व कार्यकर्ते उपस्थित होते. सदरील सभेस नागरिकांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळाला.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

दहशतवाद

Sharad Pawar: “आम्ही दहशतवाद संपवला, आता काही चिंता नाही असे सांगितले...

0
मुंबई | Mumbai पहलगाम बैसरन घाटीमध्ये पर्यटकावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारने पाकिस्तानला जो संदेश दिला आहे, तो योग्यच आहे. अशा निर्णयात सर्वपक्षीयांनी सरकार सोबत...