Friday, May 3, 2024
Homeनंदुरबारलहान भावाने केला मोठ्या भावाचा खून

लहान भावाने केला मोठ्या भावाचा खून

नंदुरबार Nandurbar । प्रतिनिधी-

तळोदा (Taloda) तालुक्यातील प्रतापपूर शिवारातील शेतात बैल विकण्याच्या वादातून (From a bull sale dispute) भावाने भावाचा (Brother to brother) लाकडी डेंगार्‍याने मारहाण (Beating) करून खून (murder) करून मृतदेहाची विल्हेवाट लावल्याची घटना घडली. याबाबत तळोदा पोलीस ठाण्यात (Taloda Police Station) खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दि.24 सप्टेंबर रोजी रात्री 9 वाजेच्या सुमारास प्रतापपूर गावाच्या शिवारातील साहेबराव चव्हाण यांच्या शेतातील झोपडीत सारपा कर्मा पाडवी (रा.राणीपूर ता.तळोदा) याने बैल विकत मागीतल्याच्या कारणावरुन बामण्या कर्मा पाडवी (वय 50 वर्षे, रा.चिवलउतार ता.अक्कलकुवा) यास लाकडी डेंगार्‍याने डोक्याला मारुन जिवे ठार केले. तसेच खून करुन मृतदेहाची विल्हेवाट लावली. घटनेच्या साक्षीदार कौशल्याबाई सारपा पाडवी हीस जिवे ठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी रायकाबाई बामण्या पाडवी यांच्या फिर्यादीवरून तळोदा पोलीस ठाण्यात सारपा कर्मा पाडवी याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला पोलिसांनी अटक केली आहे. पुढील तपास सपोनि अमितकुमार बागुल करीत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या