Tuesday, November 26, 2024
Homeब्लॉगचाळीसगावातील तरुणाई अडकतेय गुन्हेगारीच्या विळख्यात..!

चाळीसगावातील तरुणाई अडकतेय गुन्हेगारीच्या विळख्यात..!

मनोहर कांडेकर

चाळीसगाव chalisgaon प्रतिनिधी-

- Advertisement -

चाळीसगाव तालुक्याच्या इतिहासात प्रथम ११ आरोपींच्या टोळींला एकाच वेळी मोक्का लावण्यात आला, तर एक आरोपीवर एमपीडीए ऍक्ट अंतर्गत कारवाई करुन स्थानबध्द करण्यात आले. पोलीस प्रशसानच्या धडाकेबाज कारवाईमुळे गुन्हेगारी जगात मोठा हदरा बसला. परंतू गेल्या दहा वर्षात चाळीसगाव मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी का ? वाढली. अल्पवयीन तरुणाई गुन्हेगारी का ? वळत असून गुन्हेगारीच्या विळख्यात अडकत आहेत. यावर विचार, विनिमय व चितंन करण्याची आज नितांत गरज आहे. गुन्हेगारी जगातील दोन मोठ्या कारवाईमुळे एकीकडे गुन्हेगारी वचक बसला. तर दुसरीकडे चाळीसगावची अबु्र वेशीला टागली गेली. गेल्या दहा ते पंधरा वर्षापूर्वी शांतता प्रिय असलेल्या चाळीसगावच्या शांततेला खून व दोन मोठ्या कारवाईमुळे गालबोट लागल्याचे म्हटले तर वावगे ठरणार नाही.

चाळीसगाव शहरातील वाढत्या गुन्हेगारीला लगाम लावण्यासाठी जळगाव स्थानिक गुन्हे शाखातर्फे दि,२८ रोजी २०२३ रोजी शहरातील ११ आरोपीतांवर अखेर मोक्का कायद्या अंतर्गत कारवाई करण्यात आली. गेल्या २० दिवसांपूर्वीच शहरात खून झाल्यामुळे शहरातील वातावरण तग झाले होते. तर अनेक दिवसांपासून मारामार्‍या व इतर टोळी गुन्हेगारीमध्ये वाढल्यामुळेच पोलीस प्रशासनाने हा निर्णय घेतला. चाळीसगाव शहर पो.स्टे. गु.र.नं. ४८५ / २०२२ भादंवि क. ३०७, ३२४, १४३, १४७, १४८, १४९, १२०(ब) या गुन्हयांतील आरोपी (टोळी प्रमुख) अमोल छगन गायकवाड वय २५, ( टोळी सदस्य) सुमित ऊर्फ बाबा अशोकराव भोसले, कृष्णा छगन गायकवाड, संतोष ऊर्फ संता पहेलवान रमेश निकुम, विक्की ऊर्फ शुभम विजय पावले वय २३, श्याम ऊर्फ सॅम नामदेव चव्हाण वय २४, सचिन सोमनाथ गायकवाड वय २२, जयेश दत्तात्रय शिंदे (पाटील) वय २४, उद्देश ऊर्फ गुड़ सुधिर शिंदे वय २४, योगेश रतन पांचाळ (पडवळकर) वय २६, पुष्पराज ऊर्फ सुनिल जगताप यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे. पोलीस प्रशासनातर्फे या टोळीवर वरील दाखल गुन्हयांत मोक्का कायदयाचे कलम वाढवून सर्व आरोपीवर दि,२५ रोजी मोक्का लावण्यात आला. ही घटना ताजी असताना आरोपी निखील उर्फ भोला सुनिल अजबे (वय २१) रा. नारायणवाडी, चाळीसगांव यास एमपीडीए ऍक्ट अंतर्गत कारवाई करुन स्थानबध्द करण्यात आले आहे. अजबे विरुध्द चाळीसगांव शहर पोलीस स्टेशनला जिवेठार मारण्याचा प्रयत्न करणे, जबरी चोरी, दुखापत यासारखे गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. आता सुनिल अजबे विरोधात एमपीडीए ऍक्ट अंतर्गत कारवाई करुन स्थानबध्द करण्यात आले आहे. दिनांक ३१/०१/२०२३ रोजी सपोनि. सागर ढिकले, पोना. अमित बाविस्कर, पोकॉ. अमोल भोसले, पोकॉ. रविंद्र बच्छे यांनी अमरावती मध्यवर्ती कारागृह येथे दाखल स्थानबध्द केले.

गेल्या दहा वर्षात गुन्हेगारी का ? वाढली-

चाळीसगाव हे गेल्या दहा वर्षापूर्वी शांतता प्रिय होते. दहा वर्षापूर्वी देखील मारा-मार्‍या व इतर किरकोळ कारणामुळे काही प्रमाणात शहराची शांतता भंग होत होती. परंतू त्यावर प्रशसानाच्या मदतीने वेळीच नियंत्रण मिळवले जात होते. गेल्या दहा वर्षापासून तालुक्यातील राजकरणात निवडणुकामध्ये वापरला जाणार वरेमाप पैसा व पोलिसांच्या कामकाज नेहमीच होणार्‍या राजकिय हस्तक्षेपामुळे शहरासह तालुक्यात मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी फोफावल्याचे बोलले जात आहे. गेल्या दहा वर्षात अनेक अल्पवयीन हे गुन्हेगारीकडे वळण्यामागचे हे सर्वात मोठे कारण आहे. याचे उदाहरण द्यायचे झाले तर मारामार्‍यावर गुन्हेगारीत शामिल अनेक तरुणांचे फोटो राजकिय नेत्यांच्या वाढदिवासाच्या इतर कार्यक्रमांध्ये बॅनरवर व सोशल मिडियामध्ये अनेकदा झळकले आहेत. तसेच तालुक्यात बेरोजगारांची वाढती संख्या, दोन नंबर धंदे अशी अनेक कारणे आहेत. मारामार्‍या व दोन नबंर धंद्यामुळेच लहान-मोठ्या घटनासाठी एका पक्षाचेे कार्यकर्ते व पदाधिकारी नेहमीच पोलीस स्टेशनला स्थान मांडुन बसयाचे, तर विरोधकांवर कारवाईसाठी पोलीस प्रशासनावर दबाव टाकत असल्याची देखील चर्चा आहे. गेल्या दहा वर्षात दोन नंबर धंदे, विशेष करुन रॅशनचा काळाबजार, वाळू व गुटख्याचे मोठे रॅकट चाळीसगावातून चालते. यात मोठ्या प्रमाणात काही पक्षाचे कार्यकर्ते, पदाधिकारी देखील शामिल आहेत. तर अनेक वर्षांपासून सट्टा, मटका व पत्ता हे दोन नबंरचे धंदे पोलीस देखील लक्ष्मीदर्शनासाठी चालू देत आहेत. आज घडीला देखील शहरासह तालुक्यात मोठ्या प्रमाणात दोन नबंरचे धंदे चालू असल्याची चर्चा आहे. परंतू पोलीस प्रशासन वेळोवेळी तात्पुरत्या कारवाई करुन, आम्ही खूप मोठ्या कारवाई करत असल्याचे भासवत, वरिष्ठांच्या व जनतेच्या डोळ्यात धुळ फेकत असल्याची चर्चा प्रामाणिक पोलीस कर्मचार्‍यांमध्ये दबक्या आवाजात आहेत.

तरुणांची मानसीकता बदल्याची गरज-

शहरासह तालुक्यातील अल्पवयीन तरुण हे गेल्या दहा वर्षात गुन्हेगारी जगात मोठ्या प्रमाणात वळले आहेत, यात दुमात्र शंका नाही. घरची परिस्थिती हालाकीची असल्याने दोन नंबर धंद्यावाले, अनेक गावगुंड व गल्ली बोळातील भाईगिरी करणारे आशा मुलांना हेरुन, त्यांची पाऊले गुन्हेगारी जगाकडे वळवतात. मोक्का व एमपीड अंतर्गत कारवाई झालेल्यामध्ये बरेच तरुण हे २५ च्या आतील आहेत. या वयात त्याच्यांवर इतकी मोठी कारवाई झाल्यानतंर ते खरच पुढे काय ? करतील हे सांगण्याची गरज नाही. काही सदन परिवारातील तरुण देखील या वाईट संगत व सोशल मिडियामुळे गुन्हेगारीच्या जाळ्यात हटकले आहेत. यापुढे गुन्हेगारीपासून दुर राहण्यासाठी तालुक्यातील अल्पवयीन तरुणांची माणसीकता बदलविण्याची नितांत गरज आहे. चाळीसगाव तालुक्यात वैचारीक पिढी घडविण्यासाठी, शाळा, कॉलेज व महाविद्यालयामध्ये व्यक्तीमत्वविकास, कायदेविषयी व समाजप्रबोधानावर मोठ्या प्रमाणात शिबीर घेण्याची नितांत गरज आहे. तर शहरासह तालुक्यात गल्ली, बोळांमध्ये, झोपटपट्टींमध्ये शिबीरे घेण्याची गजर आहे. दुदैवाने चाळीसगावातील लोकप्रतिनिधी हे करतांना दिसून येत नाहीत. फक्त माध्यमांमध्ये प्रसिध्दीसाठी दोन बड्या नेत्यांची सद्या उठाठेव सुरु असल्याचे दिसून येत आहे. फक्त महापुरुषाच्या जयंत्या, उत्सव व नेत्यांचे वाढदिवस साजरे करण्यासाठी गोडगोड कार्यक्रम घेवून चालणार नाही. तर चाळीसगाव तालुक्यात संशोधक, विचारवंत, लेखक घडविण्यासाठी आतापासून ‘ महापुरुषाचे वैचारिक बिजारोपण ’ करण्याची गरज आहे, नाहीतर गुन्हेगारी जगतात चाळीसगावचे नाव लवकरच नंबर १ वर राहिल, आणि त्यामुळे इथल्या तरुणाकडे हिनकस व वेगळ्या नजरेतून लोक बघतील, यात दुमात्र शंका नाही. परिणामी रोजगार, वैवाहिक व इतर समस्यांना चाळीसगावच्या तरुणाईला भविष्यात तोंड द्यावे लागेल.

वर्षाच्या सुुरुवातीलाच खळबळ-

सन २०२३ वर्षाच्या सुरुवात तालुक्यात झालेल्या दोन मोठ्या कारवाईचे दुरगामी परिणाम अगामी निवडनुकांमध्ये दिसून येणार आहेत. कारण ज्या गुन्हेगारांवर कारवाई झाल्याआहेत. ते कोणत्या-कोणत्या पक्षाचे कार्यकर्ते, सेना, संघटनांचे पदाधिकारी असल्याची बोलले जात आहे. त्यामुळे भविष्यात याचे दुरगामी परिणाम चाळीसगावात उमटण्याची चिन्ह दिसत आहेत.

इतर टोळीवरही कारवाई व्हावी-

शहरात संक्रातीच्या सणालाच खूना सारखी गंभीर घटना घडली आहे. तर गेल्या अनेक दिवसांपासून शहरात मारमारी व गैगवार सारख्या गंभीर घटना घडत आहे. त्यामुळे इतर आरोपींवरही मोक्का अंतर्गत कारवाईची गरज आहे. फक्त एका टोळीवर कारवाई न करता इतर टोळीवर देखील मोक्का अतर्ंगत कारवाई करावी अशी चर्चा शहरात आहे. तालुक्यात प्रथम मोक्का व एमपीडीए ऍक्ट अंतर्गत कारवाई केल्यामुळे पोलीस प्रशसनाचे स्वागत होत आहे. परंतू ही कारवाई एकतर्फी असून राजकिय दबावामुळेच केल्याची देखील चर्चा आता शहरात रंगू लागल्या आहेत. परंतू ज्या आरोपीविरुध्द गंभीर स्वरुपाचे शरीरा विरुध्द व मालाविरुध्दचे तसेच वाळु चोरीचे गुन्हे उदा. खुन करणे, जिवे ठार मारण्याचा प्रयत्न करणे, गंभीर दुखापत, जबरी चोरी, दरोडा, चोरी यासारखे गुन्हे दाखल आहेत व वेळोवेळी कायदेशीर कारवाई करुन तसेच कठोर प्रतिबंधक कारवाई करुन देखील त्यांच्या वर्तवणुकीत सुधारणा होत नाही व ते वारंवार गंभीर स्वरुपाचे गुन्हे करण्याच्या सवयीचे आहेत, अशा धोकादायक व सराईत जास्तीत जास्त गुन्हेगारांविरुध्द मोक्का व मोक्का कायद्यान्वये कठोर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस प्रशासनातर्फे मिळाली आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या