धुळे – प्रतिनिधी dhule
येथील जिल्हा परिषदेच्या (Zilla Parishad) अध्यक्षा सौ.अश्विनी पाटील यांनी सोमवारी सकाळी अचानक जिल्हा परिषदेच्या विविध विभागांमध्ये धडक भेट देत कर्मचाऱ्यांची हजेरी घेतली.
खुनातील आरोपीला शिर्डीतून अटक ; धुळे शहर पोलिसांची वेगवान कामगिरी
उशिरा येणाऱ्या कर्मचाऱ्यांना खडे बोल सुनावले. सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांनी कार्यालयीन वेळेचे पालन करावे, अन्यथा कारवाई करण्यात येईल असा दमही भरला. अध्यक्षांनी हजेरी घेतल्यानंतर अधिकारी कर्मचाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली.
धुळे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष सौ.अश्विनी पाटील यांनी सकाळी सव्वा दहा वाजेच्या सुमारास जिल्हा परिषदेच्या विविध विभागात भेट देऊन हजेरी घेण्यास सुरुवात केली. कार्यालयात जाऊन हजेरी पत्रक तपासण्यात आले. काही कर्मचाऱ्यांनी स्वाक्षरी केली नसल्याचे आढळले तर काही महाभागांनी पुढच्या आठवड्याच्या सह्या अगोदरच केल्याचे निदर्शनास आले. त्यांच्यासमवेत धुळे पंचायत समितीच्या सभापती वंदना मोरे, सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी ए.जे.तडवी आदी उपस्थित होते.