Thursday, June 13, 2024
Homeनगरचोरी करण्यासाठी आलेल्या दोघांना पकडले

चोरी करण्यासाठी आलेल्या दोघांना पकडले

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

- Advertisement -

माळीवाडा बस स्थानकामधील दुचाकी पार्किंगमध्ये दुचाकी चोरी करण्यासाठी आलेल्या दोघांना कोतवाली पोलिसांनी पकडले. त्यांच्याकडे चार बनावट चाव्या मिळून आल्या आहेत. अमित अनंत उजागरे (वय 34 रा. मराठी मिशन कंपाउंड जवळ, कोठी, स्टेशन रस्ता), रवींद्र धोंडीराम कांबळे (वय 38 रा. राघवेंद्र मंदीरासमोर, बोल्हेगाव) अशी त्यांची नावे आहेत.

पोलीस अंमलदार सोमनाथ राऊत यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दोघांविरूध्द भादंवि कलम 122 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोमवारी (दि. 28) रात्री सव्वा बारा वाजता ही कारवाई करण्यात आली. पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस निरीक्षक विश्वास भान्सी व पोलीस अंमलदार यांचे पथक माळीवाडा बस स्थानक परिसरात गस्त घालीत असताना त्यांना दोघे चोरीच्या उद्देशाने मिळून आले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या