Monday, April 27, 2026
Homeब्रेकिंग न्यूजठेंगोड्यातील सिद्धिविनायक मंदिरात चोरी

ठेंगोड्यातील सिद्धिविनायक मंदिरात चोरी

लोहणेर | वार्ताहर Lohner

- Advertisement -

भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या ठेंगोडा येथील स्वयंभू सिद्धिविनायक मंदिरात अज्ञात चोरट्यांनी दानपेटी फोडून सुमारे २५ हजार रोख रक्कमेसह अभिषेका साठी असलेली गणपतीची पितळेची मूर्ती चोरून नेल्याचा प्रकार आज सकाळी उघडकीस आला. या घटनेने एकच खळबळ उडून भाविकांमध्ये संतापाचे वातावरण पसरले आहे.

ठेंगोडा येथील सिध्दीविनायक मंदिरात काल मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास अज्ञात दोन चोरट्यांनी मंदिर आवारात प्रवेश करून गाभार्‍याच्या दक्षिण बाजूला असलेला लोखंडी दरवाजा तोडून मुख्य गाभार्‍यात प्रवेश केला. यावेळी मुख्य गाभार्‍यातील दानपेटी फोडून सुमारे २५ हजार रुपये रोख व अभिषेकासाठी असलेली पितळेची गणपतीची मूर्ती या चोरट्यांनी लंपास केली.

आज पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास पुजेसाठी योगेश सहादु वाघ हे मंदिरात आले असता दानपेटी फुटल्याचे त्यांच्या निर्देशनास आले. याबाबत सिद्धिविनायक गणपती मंदिर ट्रस्टचे सचिव मोतीराम चौधरी यांनी सटाणा पोलीसात तक्रार दाखल करताच पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.

पोलिसांनी तपासास प्रारंभ करत नाशिक येथून श्वान व ठसे तज्ञ पथकास पाचारण केले होते. सदर श्वानाने मंदिर परिसर व उत्तर बाजूने मारुती मंदिरापर्यत माग दाखविला. पोलीस निरीक्षक योगेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक ए. आर.बोरसे हे या गुन्ह्याचा तपास करीत आहेत.

भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या या मंदिरात २०२३ मध्ये गाभार्‍याच्या बाहेरील दानपेटी फोडून चोरी करण्यात आली होती. आता चोरट्यांनी मुख्य गाभार्‍यातील दानपेटी फोडून चोरी केली आहे. मंदिर परिसरात कायम स्वरूपी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात यावा तसेच ट्रस्टतर्फे सुरक्षा रक्षक नेमण्यात येणार असल्याची माहिती अध्यक्ष यशवंत पाटील यांनी दिली.

दरम्यान या घटनेने भाविकांमध्ये संतापाचे वातावरण पसरले असून पोलिसांनी त्वरीत चोरट्यांचा शोध घेत त्यांच्याविरूध्द कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली गेली.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : सर्वप्रथम शिर्डीत पोहोचले खरातचे ‘डर्टी पिक्चर्स’

0
नाशिक |प्रतिनिधी| Nashik स्वतःला अवतार मानणार्‍या अशोक खरातचे काळे साम्राज्य उद्ध्वस्त होण्यामागे कोणत्याही बाहेरील यंत्रणेपेक्षा त्याच्या आतल्या गोटातील माणसांनी दाखवलेले धाडस निर्णायक ठरल्याचे उघड झाले...