Tuesday, April 23, 2024
Homeनगरचोरीच्या गुन्ह्यात दोघे व मारहाण करणारा एक अटकेत

चोरीच्या गुन्ह्यात दोघे व मारहाण करणारा एक अटकेत

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

बुलढाणा येथील पोलीस उपनिरीक्षकास प्रवासादरम्यान मारहाण करणार्‍याला अटक करण्यात आली आहे. गुन्ह्यात वापरलेली कार जप्त केली आहे. तसेच विकास कार्यकारी सोसायटी, शेंडी येथे चोरी करणारे आणखी दोघेही अटक करण्यात आले आहे. त्यांच्याकडून 26 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. एमआयडीसी पोलिसांनी या दोन्ही कामगिरी केल्या आहेत.

- Advertisement -

28 मार्च, 2023 रोजी बुलढाणा येथील पोलीस उपनिरीक्षक दिनेश प्रल्हाद शिरेकर हे शेंडी येथे त्यांचे कुटुंबियांसोबत थांबले असताना अज्ञात दोघांनी त्यांच्यावर हल्ला करून त्यांना जखमी केले होते. त्यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल होता. या गुन्ह्यातील संकेत बाजीराव ससे यास पुणे येथून ताब्यात घेत अटक केली. त्याला एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. 6 मार्च 2023 रोजी शेंडी गावामधील विकास कार्यकारी सहकारी सोसायटीमध्ये चोरी झाली होती.

त्याबाबत एमआयडीसी पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल होता. सदर गुन्ह्यातील पसार असलेले सागर गवाजी देठे, संदेश गवाजी देठे (दोघे रा. शेंडी) यांना ताब्यात घेत अटक केली आहे. सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी अजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप, उपनिरीक्षक योगेश चाहेर, अंमलदार नंदकुमार सांगळे, सुरेश सानप, नवनाथ दहिफळे, गणेश कावरे, संदीप आव्हाड, दीपक गांगर्डे यांच्या पथकाने केली.

- Advertisment -

ताज्या बातम्या