Friday, September 20, 2024
Homeक्राईमपैठणींच्या दुकानात चोरट्यांचा डल्ला

पैठणींच्या दुकानात चोरट्यांचा डल्ला

- Advertisement -

येवला | प्रतिनिधी Yeola

येवला – वैजापूर महामार्गावरील खामगाव पाटी शिवारात पैठणींचे दुकान फोडून अज्ञात चोरट्यांनी सुमारे सात लाख रुपये किंमतीच्या पैठणी साड्या चोरून नेल्याची घटना घडली आहे.

शनिवारी, (दि. ३१) रात्रीच्या सुमारास खामगाव पाटी शिवारात असणाऱ्या कदम पैठणी या दुकानाचे मागील बाजूची पत्रे अज्ञात चोरट्यांनी खोलून दुकानातील सुमारे सात लाख रुपये किमतीच्या पैठणी साड्या चोरून नेल्या.

दरम्यान, या प्रकरणी तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस करत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या