Thursday, May 23, 2024
Homeनगरचोरट्यांचा चक्क कोंबड्यांवर डल्ला

चोरट्यांचा चक्क कोंबड्यांवर डल्ला

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

पोल्ट्री फार्ममधून 20 कोंबड्या चोरट्यांनी चोरल्या. देऊळगाव सिद्धी (ता. नगर) शिवारात शुक्रवारी (दि. 26) रात्री दोन ते पहाटे पाच वाजण्याच्या दरम्यान ही चोरी झाली. हरीश गिरीधारीलाल मध्यान (वय 50, रा. गायकवाड कॉलनी, सावेडी) यांचे देऊळगाव सिद्धी (ता. नगर) शिवारात पोल्ट्री फार्म आहे.

- Advertisement -

चोरट्यांनी पोल्ट्री फार्मच्या शेडच्या लोखंडी तारा उचकटून आत प्रवेश केला. आठ महिने वयाच्या 20 कोंबड्या (किंमत सुमारे पाच हजार रुपये) चोरल्या. मध्यान यांनी दिलेले फिर्यादीवरून नगर तालुका पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक लबडे या गुन्ह्याचा तपास करत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या