Friday, May 3, 2024
Homeनाशिकदिंडोरीत भरदिवसा चोरी; तीन तोळे सोने, 1 लाख 38 हजारांची रक्कम लंपास

दिंडोरीत भरदिवसा चोरी; तीन तोळे सोने, 1 लाख 38 हजारांची रक्कम लंपास

दिंडोरी | प्रतिनिधी | Dindori

दिंडोरी शहरातील शिवाजीनगर येथील संतोष शरद साताळकर यांच्या मालकीच्या लक्ष्मी निवास या घरात भरदिवसा धाडसी चोरी होवून तीन तोळे सोने व 1 लाख 38 हजार रक्कमेची चोरी झाल्याने एकच खळबळ उडाली आहे…

- Advertisement -

दिंडोरी शहरात सध्या चोरीचे प्रमाण वाढत चालले आहे. आता भरदिवसाही चोर्‍या होत असल्याने नागरिक भयभीत झाले आहेत. दिंडोरी येथील शिवाजीनगर येथे रहात असलेले संतोष शरद साताळकर यांच्या पत्नी उज्वला साताळकर या (दि.12) रोजी दुपारी 1 वाजेच्या सुमारास घर बंद करुन एलआयसी ऑफिसमध्ये गेल्या.

छगन भुजबळांचे शिवसेनेच्या जाहिरातीवर टीकास्र; म्हणाले…

त्यानंतर साधारण 2 वाजता त्या घरी परतल्या असता त्यांच्या घराच्या गेटमधून दोन अनोळखी व्यक्ती बाहेर पडतांना दिसले. त्यांच्या हातात चाकू होता. उज्वला साताळकर यांना चाकू दाखवत बाजूला सरकण्यास सांगितले व तेथून निघून गेले.

त्यावेळी त्या घराच्या दरवाज्याजवळ गेल्या असता कुलूप तोडलेले आढळले. तेव्हा पती संतोष साताळकर यांना घडलेली माहिती सांगितली. घरात जावून बघितले असता घरातील तीन तोळे सोने व 1 लाख 38 हजार रक्कम चोरी झाल्याचे निदर्शनास आले. याबाबत दिंडोरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस निरीक्षक प्रमोद वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक अजय कौटे व पोलिस करीत आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

Earthquake : दिल्ली-एनसीआरसह शेजारील चार राज्यांमध्ये भूकंपाचे झटके!

- Advertisment -

ताज्या बातम्या