येवला | प्रतिनिधी Yeola
येथील येवला – नगर महामार्गावरील लक्कडकोट पैठणी दुकानातून अज्ञात चोरट्यानी सुमारे दीड कोटी रुपयांच्या पैठणी साड्या चोरून नेल्याने खळबळ उडाली आहे.
हे देखील वाचा – Cyber Crime : आधार कार्ड अपडेट करण्याचा केला बहाणा; तीन लाख रुपयांना घातला गंडा
मंगळवारी, (दि. २६) रोजी रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी लक्कडकोट पैठणी मध्ये दुकानाच्या पाठीमागील खिडकीचे ग्रील तोडून दुकानात प्रवेश केला. दुकानातील सुमारे दीड कोटी रुपयांच्या पैठणी साड्यांसह सीसीटीव्हीचा डीव्हीआर देखील चोरट्यांनी चोरून नेला.
हे देखील वाचा – Accident : कार-दुचाकीचा अपघात; पती-पत्नीचा मृत्यू
अशी माहिती संचालक सुनील लक्कडकोट यांनी दिली. दरम्यान, घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी बाजीराव महाजन, शहर पोलीस निरीक्षक धीरज महाजन, सहाय्यक निरीक्षक नितीन लोखंडे आदींनी भेट देवून माहिती घेतली. या प्रकरणी शहर पोलीस अधिक तपास करत आहेत.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा