Monday, May 27, 2024
Homeजळगाव...तर आषाढीला फडणवीसांच्या हातून होणार महापूजा

…तर आषाढीला फडणवीसांच्या हातून होणार महापूजा

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

राज्याच्या राजकारणात (state politic) नाट्यमय घडामोडी (Dramatic events) घडत आहे. लवकरच राज्यात आपली सत्ता येणार असून आषाढीला पंढरपुरात (Ashadhila to Pandharpur) भाजपचे मुख्यमंत्री (Chief Minister of BJP) म्हणून देवेंद्र फडणवीांच्या (Devendra Fadnavis) हातून महापूजा (Mahapuja) होणार असल्याचे विधान खा. उन्मेष पाटील (MP Unmesh Patil) यांनी भाजपच्या वसंत स्मृती कार्यालयात केले.

- Advertisement -

जळगाव लोकसभा मतदार संघाचे खा. उन्मेष पाटील यांच्या वाढदिवसानिमत्त भाजप कार्यालयात कार्यक्रम आयोजीत कार्यक्रमात ते बोलत होते. पुढे बोलतांना खा. पाटील म्हणाले की, जिल्ह्यासह राज्यातील सर्वच आमदार सुरत, गुवाहाटी व मुंबईत गेले आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात नाट्यमय घडामोडी घडतांना दिसून येत आहे.

भविष्यात राज्यात स्थापन होणार्‍या सत्तेनंतर राज्याच्या विकासात निर्माण झालेली पोकळी भरुन काढली जाणार असल्याने फिर वही दिन लाया हूं असे म्हणत त्यांनी राज्यातील सत्तांतरणाचे संकेत दिले आहे. सत्तांतरणानंतर महाराष्ट्राला पुन्हा विकासाच्या एक वेगळ्या उंचीवर न्यायचा असल्याचे देखील ते यावेळी म्हणाले.

आपण सर्व मोंदीच्या विकासजत्रेतील वारकरी

ज्या दृष्टीने राज्यात घडामोडी घडत आहेत. त्याच्या माध्यमातून पंढरपूरच्या विठ्ठलाची महापूजा ही भाजपचे देवेंद्र फडणवीस यांच्या हातून होईल. राज्यातील जनतेला त्याची आतुरता लागली आहे. तसेच आपण मोंदीच्या विकासाच्या जत्रेतील वारकरी असल्याचे खा. उन्मेष पाटील यावेळी म्हणाले.

- Advertisment -

ताज्या बातम्या