वास्तू आणि सूर्य यांचे अनोखे नाते सांगितले आहे. सूर्याच्या हालचाली लक्षात घेऊन दिशाशी संबंधित वास्तूचे नियम बनवण्यात आले आहेत, जेणेकरून सूर्याची ऊर्जा तुमच्या घरात अधिक प्रमाणात प्रवेश करून घरात सकारात्मक ऊर्जेचा संचार वाढून आनंद आणि शांतता राहील. त्यामुळे सूर्य भ्रमणाच्या दिशांच्या आधारे घराची वास्तू तयार केली तर तुम्हाला जास्तीत जास्त लाभ मिळतील. जाणून घेऊया वास्तूचे हे नियम.
नागपंचमी आणि श्रीकृष्णाचं नातं
भावाला चिरंतन आयुष्य आणि अनेक आयुधांची प्राप्ती होवो आणि तो प्रत्येक दु:ख आणि संकट यातून तारला जावो हेही उपवास करण्यामागे एक कारण आहे. या विषयीची कथा खालीलप्रमाणे…
नागपंचमीसाठी वेदकालापासून अनेक प्रथा आहेत. त्यापेकी एक कथा..सत्येश्वरी नावाची एक देवी होती. सत्येश्वर हा तिचा भाऊ होता. सत्येश्वराचा मृत्यू नागपंचमीच्या आदल्या दिवशी झाला. त्यामुळे भावाच्या शोकात सत्येश्वरीने अन्न ग्रहण केले नाही. सत्येश्वरीला तिचा भाऊ नागरूपात दिसला. तेव्हा तिने त्या नागरूपाला आपला भाऊ मानले. त्या वेळी नागदेवतेने वचन दिले की, जी बहीण माझा भाऊ म्हणून पूजा करील, तिचे रक्षण मी करीन. त्यामुळेच त्या दिवशी नागाची पूजा करून प्रत्येक स्त्री नागपंचमी साजरी करते. पूजेबाबतचा एक प्रसंग भगवान श्रीकृष्णाशीही निगडीत आहे. याबाबतची कालियामर्दनाची आख्यायिका प्रसिद्ध आहे. या आख्यायिकेनुसार बाळकृष्णाला मारण्यासाठी कंस राजा कालिया नामक नागाला पाठवतो. पहिले हा नाग गावात दहशत निर्माण करून लोकांना भयभयीत करतो. मग एके दिवशी जेव्हा बाळकृष्ण आपल्या मित्रांसोबत नदीकिनारी खेळत असतो तेव्हा त्यांचा चेंडू नदीत पडतो. जेव्हा तो चेंडू आणण्यासाठी कृष्ण नदीत उतरतो तेव्हा कालिया नाग आक्रमण करतो. मग श्रीकृष्ण त्याचं पराभव करतो.
मग भगवान श्रीकृष्णाची माफी मागतो आणि तिथून निघून जातो. कालिया नागावरील या श्रीकृष्णाच्या विजयालाही नागपंचमी स्वरूपात साजरं केलं जातं. नागपंचमीला भावाचा दिवस किंवा भैया पंचमी असंही संबोधल जातं. बहिणी आपल्या भावांच्या रक्षणासाठी या दिवशी खास उपवास ठेवतात. फक्त भाजके पदार्थ खाऊन हा उपवास ठेवला जातो. तर ज्या मुलींना भाऊ नसतो त्या नागालाच आपला भाऊ मानून नागाची पूजा करतात. महाराष्ट्रात आजही मुली-सुना झाडांना झोके बांधून या दिवशी गाणी म्हणतात. नागाची पूजा करण्याआधी हाताला मेंदी लावतात. तसंच या दिवशी सुनांना माहेरीही पाठवण्याची प्रथा प्रचलित आहे. नागपंचमीच्या दिवशी विळीवर चिरू नये, काहीही कापू नये, तळू नये आणि चुलीवर तवा ठेवू नये असे संकेत पाळले जात असत.
पूर्वीच्या काळी नागपंचमीच्या दिवशी अनेक गोष्टीचं कटाक्षाने पालन केलं जात असे. ज्यामध्ये त्या दिवशी शेतात नांगर न चालवणे, हत्यारं न वापरणं. पण आता नागपुजेसाठी नागदेवतेच्या फोटोची किंवा मातीपासून अथवा धातूपासून बनवलेल्या नागप्रतिमेची पूजा केली जाते. तसंच या प्रतिमेला दूध, लाह्यांचा आणि खीर असा नैवेद्य दाखवला जातो. आजही बर्याच घरात नागदेवतेच्या प्रतिमेची पूजा करून चांदीच्या नागाचं दानही केलं जातं.
नागांचे प्रकार
श्रावण महिना म्हटलं की, सगळीकडे हिरवीगार नटलेली वनराई, ऊन आणि पावसाचे वातावरण आणि अनेक सणांचा महिना. श्रावण महिना म्हटलं की, सणाची सुरुवात होते. श्रावण महिन्यातील पहिला आणि महत्त्वाचा सण म्हणजे नागपंचमी. कालिया नागाचा पराभव करून यमुना नदीच्या पात्रातून श्रीकृष्ण वर आले तो दिवस म्हणजे नागपंचमी होय. नागपंचमीच्या दिवशी आठ प्रकारच्या नागांची पूजा केली जाते. हिंदू धर्मात आठ सर्प देवता आहेत. या नागदेवतांचे वेगवेगळे महत्त्व आहे. यांच्या पुजनामुळे सर्पदंश, अकाली मृत्यू, भय संपत्तीची हानी ई. संकटांपासून मुक्तता मिळते.
अनन्तं वासुकिं शेषं पद्मनाभं च कम्बलं शन्खपालं ध्रूतराष्ट्रं च तक्षकं कालियं तथा
एतानि नव नामानि नागानाम च महात्मनं सायमकाले पठेन्नीत्यं प्रातक्काले विशेषतः
तस्य विषभयं नास्ति सर्वत्र विजयी भवेत श्रश्र इति श्री नवनागस्त्रोत्रं सम्पूर्णं
वरील स्त्रोत या नवनागांचे वर्णन केले आहे.
वासुकी नाग – वासुकी नाग हा भगवान शंकराच्या गळ्यात विराजमान असतो. तो शेषनागाचा बंधू मानला जातो. देव आणि दानवांची जेव्हा समुद्रमंथन केले होते तेव्हा हाच नाग मंथनासाठी वापरला होता. वासुकी म्हणजे हा तोच नाग आहे ज्याने वसुदेवांना छोट्या बालकृष्णाला डोक्यावर घेऊन नदी ओलांडली तेव्हा या नागाने बाळाचे पावसापासून रक्षण केले होते.
अनंत नाग – हा नाग भगवान श्रीहरींचा सेवक मानला जातो. अनंत नागाच्या फण्यावर पृथ्वी विसावलेली आहे.
पद्म नाग – पद्म नागास महासर्पही म्हणतात. असे मानले जाते की, गोमती नदीजवळ पद्म नाग राज्य करत. या नागांना नागवंशी म्हणतात.
महापद्म नाग – महापद्म नागाचे नाव शंखपद्मदेखील आहे. या नागाचे वर्णन विष्णू पुराणातही आहे.
तक्षक नाग – पाताळ या नागाचे वास्तव्य आहे. महाक्रोधी असा हा नाग आहे. महाभारतात याचे वर्णन आढळते.
कुलीर नाग – या नागाचा जग्तपिता ब्रह्माजींशी या नागाचा संबंध आहे.
कर्कट नाग – कर्कट नाग हे महादेवाचे गण मानले आहेत. अतिक्रोधी असे हे नाग. शा नागाच्या प्रतिमेेचे पूजन केल्यास कालीच्या .शापापासून मुक्ती मिळते.
शंख नाग – सर्वात बुद्धीवान असा हा नाग समजला जातो.
कालिया नाग – या नागाची आणि भगवान श्रीकृष्णाचे यमुनेच्या पात्रात युद्घ हे सर्वांनाच माहीत आहे.
पद्मनाभ, अनंत, वासुकी, शंखपाल, शेष, कम्बल, धुतराष्ट्र, तक्षक आणि कालिया नाग, अश्या प्रकारे एकूण नऊ नाग देवतेच्या नावांचा उल्लेख करण्यात आला आहे. भाविकाने या स्तोत्राचे मनोभावे पठन केल्यास आपल्या मनातील नाग देवतेसंबंधी असलेली भीती नाहीशी होते. भारतीय इतिहासानुसार, इ.स. पू. 3000 साली आर्य कालखंडा दरम्यान भारतात नागवंशाच्या जमाती वास्तव्य करीत असल्याची ऐतिहासिक माहिती देखील मिळते. तसचं, त्यांची इष्ट देवता हे नाग होते. याच कारणामुळे प्रमुख नाग देवतेच्या नावावर विभिन्न प्रकारच्या नाग देवतेचे नामकरण करण्यात आलं आहे. या नागदेवतांच्या नावावरून ते वास्तव्य करीत असलेल्या ठिकाणची ऐतिहासिक माहिती मिळते. धार्मिक पुराणानुसार पूर्वी कश्मीर येथे कश्यप ऋषी राज्य करीत होते. कश्यप ऋषी यांची पत्नी कद्रू यांच्याकडून त्यांना आठ पुत्ररत्न प्राप्त झाले होते. अनंत, वासुकी, तक्षक, कर्कोटक,पद्म, महापद्म, शंख, आणि कुलिक इत्यादी. तसचं, कश्मीर येथील अनंतनाग हे स्थळ पूर्वी अनंतनाग समुदायाचे वास्तव्याचे ठिकाण होते.