Saturday, July 13, 2024
Homeभविष्यवेधश्री मृत्युंजय पारदेश्वर महादेव

श्री मृत्युंजय पारदेश्वर महादेव

संपूर्ण भारतात अद्भुत अशी अनेक शिवलिंग आहेत. शिवाची पूजा मुख्यतः शिवलिंग पूजनाने करतात. देशभरातील अनेकविध शिवाच्या मंदिरात शिवलिंगाची स्थापना केलेली आढळते. शिवलिंगाचे महत्त्व शिवपुराणात अधोरेखित केले आहे. शिवलिंग प्रथम कुठे प्रकटले, याचा उल्लेखही आढळतो. अनेक शिवलिंगाची वैशिष्ट्य, धार्मिक कथा आणि महत्व आढळते. परभणीतही असे एक शिवलिंग आहे जे अद्भुत आहे, जाणून घेऊया या शिवलिंगाविषयी.

- Advertisement -

महाराष्ट्रातील परभणी येथे पारदेश्वर हे संगमरवरी मंदीर श्री स्वामी सच्चिदानजी सरस्वती यांनी बांधले आहे. मंदिराच्या वैशिष्ट्यपूर्णतेने शिवलिंग हे मुख्य मंदिरात असून, 250 किलोग्रॅम पारा पासून बनले आहे. पारा हा बुध ग्रहाचा प्रतिक मानला जातो. हे भारतातील सर्वात मोठे शिवलिंग आहे. परादलाचे बनविलेले हे शिवलिंग यास तेजोलिंग असे म्हणतात आणि या शिवलिंगालाही बारा ज्योतिर्लिंगासमान धार्मिक महत्व आहे.

परभणी शहरातील नांदखेडा रोडवर 1993 साली महामंडलेश्वर श्री स्वामी सचितानंद सरस्वती महाराज यांनी या मंदिराची स्थापना केली आहे. विशेष म्हणजे पारा हा द्रव्य स्वरुपात असतो. मात्र, त्याला घन स्वरुपात आणून हे तब्बल अडीच क्विंटल वजनाचे शिवलिंग तयार करण्यात आले आहे. हे शिवलिंग तयार करण्यासाठी विशिष्ट योग आणि अध्यात्मिक शक्तीचा वापर केला जातो. याच शक्तीतून ही महादेवाची पिंड तयार झाली आहे असे सांगितले जाते. हे अद्भुत शिवलींग आशिया खंडात एकमेव आहे. हरिद्वार येथील हरिहरेश्वर मंदिरात अशा स्वरुपाचे शिवलींग आहे. मात्र, ते एवढे मोठे नाही. तब्बल अडीच क्विंटल वजन असलेले हे एकमेव शिवलिंग आहे.

पारद शिवलिंगाच्या पूजनाचे फायदे – शास्त्र आणि पुराणात पारद शिवलिंगाचे वर्णन अतिशय खास आणि चमत्कारी मानले गेले आहे. पौराणिक मान्यतेनुसार, पारदची उत्पत्ती भगवान शिवाच्या अंशातून झाली आहे. म्हणून पारद शिवलिंगाची पूजा केल्याने सर्व पापांचा नाश होतो. ब्रह्म पुराणात असे म्हटले आहे की, जो पारद शिवलिंगाची भक्तिभावाने पूजा करतो तो सर्व सांसारिक सुखांचा उपभोग घेतो आणि जीवनाच्या अंताला सर्वोच्च स्थान (मोक्ष) प्राप्त करतो. आयुष्यात त्यांना मान-सन्मान, उच्च पद, नाव आणि कीर्ती आणि शिक्षण मिळते.

जे लोक पारद शिवलिंग आपल्या घरात ठेवतात त्यांच्या घरात देवी लक्ष्मी, भगवान शिव आणि भगवान कुबेर यांचा कायम वास असतो. पारद शिवलिंगाची पूजा केल्याने भगवान शिवाची कृपा लवकर मिळते कारण पारद शिवलिंगाच्या पूजेचा प्रभाव इतर कोणत्याही शिवलिंगाच्या पूजेपेक्षा एक हजार कोटी पटीने जास्त असतो. त्यांची पूजा केल्याने रक्तदाब, दमा यांसारख्या आजारांमध्येही आराम मिळतो, असे मानले जाते. कुटुंबात सुख-शांती राहते आणि धन-धान्याची कमतरता भासत नाही.

पार्‍यापासून निर्माण करण्यात आलेल्या या शिवलिंगास मश्री मृत्युंजय पारदेश्वर महादेव मंदिर म्हणून ओळखले जाते. या अद्भुत शिवलिंगाचे दर्शन घेण्यासाठी राज्यातूनच नव्हे तर संपूर्ण देशातून भाविक येत असतात.ेश्रावण महिन्यानिमित्त श्रावण सोमवारी देखील येथे भाविकांची अलोट गर्दी पाहायला मिळते.

- Advertisment -

ताज्या बातम्या