Saturday, July 27, 2024
Homeभविष्यवेधसौभाग्य आणि समृद्धीचे स्वागत करा

सौभाग्य आणि समृद्धीचे स्वागत करा

वास्तूमध्ये काही वस्तू ठेवण्याचे विशेष फायदे आहेत. यातील काही चित्रे अतिशय खास मानली जातात. असे म्हणतात की, ही चित्रे घरात लावल्याने सकारात्मक ऊर्जा तर वाढतेच शिवाय तुम्हाला भाग्याची देखील साथ लाभते आणि पैशाचा प्रवाहही वाढतो. ही छायाचित्रे कोणती आहेत ते पाहूया…

असंतुलित ब्रम्हांडीय ऊर्जा आपल्या घरात वास्तु दोष निर्माण करते. याचा परिणाम आरोग्य, संपत्ती, शिक्षण, करिअर, नोकरी, लग्न, व्यवसाय इत्यादींशी संबंधित समस्या उद्भवतात, म्हणूनच या उर्जेमध्ये संतुलन कसे ठेवावे हे समजून घेणे फार आवश्यक आहे. काही चित्रे अतिशय शुभ मानली जातात. असे म्हणतात की, ही चित्रे घरात लावल्याने सकारात्मक ऊर्जा तर वाढतेच शिवाय तुम्हाला भाग्याची देखील साथ लाभते आणि पैशाचा प्रवाहही वाढतो. ही छायाचित्रे कोणती आहेत ते पाहू यात…

- Advertisement -

पर्वतांचे चित्र – घरामध्ये उंच पर्वतांचे चित्र लावल्याने प्रगती घडून येते. उंच पर्वत तुमच्या घरात शुभ उर्जेचा संचार वाढवतात. पर्वतांचे फोटो काढताना एक गोष्ट लक्षात ठेवावी की या चित्रांमध्ये पाण्याची दृश्ये नसावीत. असे म्हणतात की, ही चित्रे नैऋत्य भिंतीवर लावल्याने तुमच्या जीवनात समाधानाची भावना येते आणि तुमचा आत्मविश्वास तसेच शक्ती वाढते.

पांढर्‍या वाघाचा फोटो – वास्तूमध्ये आक्रमक प्राण्यांचे फोटो काढणे निषिद्ध असले तरी, वास्तूशास्त्रामध्ये पांढरा वाघ शुभ मानला जातो. पश्चिमेकडील भिंतीवर पांढर्‍या वाघाचे चित्र लावल्याने तुमच्या घराचे वाईट नजरेपासून संरक्षण होते. तुमच्या घरावर कोणत्याही प्रकारच्या काळ्या जादूचा प्रभाव होत नाही. यासोबतच तुमच्या घरावर शेजार्‍यांची वाईट नजर राहत नाही.

गरुड पक्ष्याचा फोटो – घरामध्ये गरुड पक्ष्याचा फोटो लावणे वास्तूनुसार खूप चांगले मानले जाते. अध्यात्माच्या दृष्टिकोनातूनही गरुड पक्षी अत्यंत शुभ मानला जातो. घरामध्ये गरुड पक्ष्याचा फोटो लावल्याने तुमची संपत्ती, बळ आणि संयम यात वृद्धी होते. असा फोटो घरामध्ये लावल्याने सकारात्मक ऊर्जेचा संचार वाढू लागतो. तुम्ही गरुडावर विराजमान विष्णू भगवानांचा देखील फोटो लावू शकतात.

समुद्राचे चित्र – वास्तूमध्ये सांगण्यात आले आहे की, घरात वाहत्या पाण्याचे चित्र असणे अत्यंत शुभ मानले जाते. हे चित्र घरात लावल्याने प्रत्येक काम पूर्ण होते आणि घरातील सदस्यांचे नशीब बळकट होते. समुद्राच्या निळ्या पाण्याचे चित्र घरात लावल्याने सुख-शांती वाढते आणि त्यासोबतच धन-संपत्तीत वृद्धी होण्याचे संकेत मिळतात.

माशांचे चित्र – जरी वास्तूनुसार, घरात फिश टँक ठेवणे सर्वात शुभ मानले जात असले, परंतु जर तुमच्या घरात फिश टँक बसवणे शक्य नसेल तर तुम्ही फिश टँकचा फोटो किंवा माशांचे चित्र घरात लावू शकता. लक्षात ठेवा की, अशी चित्रे मुख्य दरवाजाच्या डाव्या बाजूला किंवा घराच्या उत्तरेकडील भिंतीवर लावावीत. ही दिशा संपत्तीची दिशा मानली जाते आणि येथे माशांचे चित्र लावल्याने तुमच्या संपत्तीत वृद्धी होते. तुम्ही कोकरू म्हणजेच मेंढीचे चित्रही लावू शकता. असे केल्याने तुमचे भाग्य पालटते आणि समस्या हळूहळू कमी होतात.

- Advertisment -

ताज्या बातम्या