Tuesday, March 25, 2025
Homeशब्दगंधभारतवर्षातील महान विदुषी

भारतवर्षातील महान विदुषी

भारताच्या इतिहासात अनेक कर्तृत्ववान महिला होऊन गेल्या. त्यांनी त्यांची कारकीर्द गाजवली. या सदरातून ओळख करून घेऊया भारतवर्षातील अशाच काही देदीप्यमान शलाकांची.

मानवी जीवन विकासासाठी प्राचीन काळापासून स्त्रियांचे कार्य महत्त्वाचे आहे. सर्जनाबरोबर तिने सुजाणपण दिले. त्यासाठी तिने अध्ययन केले. कधी लेखणी हातात घेतली तर कधी शस्त्र. याबरोबरच तिच्या वाणीत सरस्वती होती. याची अनेक उदाहरणे आहेत.

- Advertisement -

1) अपाला – अपाला महर्षी अत्रींची एकुलती एक कन्या होती. ती लहानपणापासून अतिशय बुद्धिमान होती. वडील महर्षी अत्री विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचे कार्य करत तेव्हा आसपास खेळणारी अपाला त्यांनी शिकवलेले सर्व श्लोक लक्षपूर्वक ऐकत असे. एकदा वाचलेल्या, ऐकलेल्या वेदांमधील ऋचा तिच्या तोंडपाठ होत. तिची ग्रहणशक्ती प्रचंड होती. अपालाचा चारही वेदांचा परिपूर्ण अभ्यास अगदी लहान वयातच झाला होता. परंतु लहानपणीच तिला त्वचारोग झाला होता. त्यामुळे ती वयात येताच तिच्या वडिलांना तिच्या विवाहाची काळजी लागली होती. एकदा आश्रमात कृषाश्व नावाचे ऋषी आले. त्यांच्यासमोर कन्येच्या विवाहाचा प्रस्ताव अत्री ऋषींनी ठेवला. या प्रस्तावाचा त्यांनी स्वीकार केला. अपाला व कृषाश्व यांचा विवाह झाला. दोघांचा संसार आनंदाने सुरू झाला. ज्ञानी आणि समजूतदार अपाला उत्तम पत्नीधर्म निभावत होती. परंतु पुढे-पुढे कृषाश्व ऋषी पत्नी अपालाचा वाढता त्वचारोग बघून त्यांचे पटेनासे झाले. पतीच्या अशा वागण्याने दुःखी होऊन अपाला पितृगृही आश्रमात परत आली. वडिलांच्या मार्गदर्शनाखाली ती तप, ध्यान आणि अध्ययन करू लागली. आयुर्वेदाच्या माध्यमातून हळूहळू अपाला त्वचारोगातून मुक्त झाली. पुढे आपल्या वागण्याचा पश्चाताप होऊन पती कृषाश्व अत्री ऋषींकडे आले. त्यांनी आपल्या वर्तनाबद्दल माफी मागून पत्नी अपालाला सन्मानाने स्वगृही नेले. अशी वेदांची जाणकार ज्ञानी अपाला संकटकालीन परिस्थितीला न घाबरता त्यावर उपाययोजना करून आपल्या जीवनात यशस्वी झाली.

2) लोपामुद्रा : अगस्ती ऋषींची धर्मपत्नी लोपामुद्रा आपल्या पतिव्रता धर्मामुळे वंदनीय ठरली. अगस्त ऋषींचे वेदांच्या निर्मितीत मोठे योगदान आहे. त्यात त्यांनी मांडलेल्या अगस्त लोपामुद्रा संवादावरून त्यांच्या कार्यात लोपामुद्राची किती महत्त्वाची भूमिका होती हे लक्षात येते. अगस्ती ऋषींना तमीळ भाषेचे व्याकरण, संगीत शास्त्र, साहित्य व नाट्यशास्त्राचे जनक मानले जाते. संपूर्ण भारतवर्षात भ्रमण करणारे तपस्वी ज्ञानी तसेच शीघ्रकोपी अगस्ती ऋषींना विदर्भ राजाची कन्या लोपामुद्रा ही स्वतःसाठी पत्नी म्हणून योग्य वाटली. त्यांनी विदर्भ राजासमोर तिच्याशी विवाहासाठी प्रस्ताव ठेवला. परंतु विदर्भ राजाला आपली राजवैभवात वाढलेली कन्या ऋषीला देणे योग्य वाटेना. तेव्हा लोपामुद्राने स्वतः वडिलांचे मन वळवत ऋषी अगस्तींबरोबर विवाहाला मान्यता दिली. राजवस्त्र, आभूषणे यांचा त्याग करून तिने पतीमागे फिरत भारत भ्रमण केले. पुत्रप्राप्तीसाठी पतीसमोर अटी व शर्ती ठेवण्याचे धैर्य तिने दाखवले. लोपामुद्राने दृढस्यू नावाच्या पराक्रमी पुत्राला जन्म दिला. लोपामुद्राने ज्ञान निर्मितीत पती ऋषी अगस्तींना मोलाची साथ दिली. त्याबरोबरच तिने ऋग्वेदातील प्रथम मंडलमध्ये 179 व्या सुक्ताची रचना केली. शास्रोक्त पद्धतीत यज्ञ, विधी आणि पौराणिक ज्ञान यासाठी लोपामुद्राचे नाव प्रसिद्ध आहे. तिने ललित सहस्रनामाचा प्रचार व प्रसार केला.

3) घोषा : या विदुषेचा उल्लेख ऋग्वेदामध्ये मिळतो. मंत्र ज्ञानात ती सिद्धहस्त तर होतीच त्याचबरोबर अध्यात्म आणि दर्शनशास्र यामध्ये तिला ज्ञानी मानले जायचे. वैदिक विज्ञानाचे तिला अतिशय चांगले ज्ञान होते. त्वचा विद्येमध्ये ती जाणकार होती.

4) विदुषी विश्ववारा : महर्षी अत्री यांच्या वंशात विद्युषी विश्ववाराचा जन्म झाला. योगाभ्यास आणि इतर विषयांच्या सखोल अध्ययनाने तिने ब्रह्मवादिनी पद प्राप्त केले. ऋग्वेदामधील अनेक ऋचांवर तिने अतिशय सखोल आणि मार्मिक विवेचन केले आहे. विश्ववाराने अनेक प्रयोगांद्वारे स्री वर्तनशास्त्राचे विवेचन केले आहे. स्त्रियांनी घरी आलेल्या पाहुण्यांचे कशाप्रकारे सावधानतेने आथित्य करावे त्याचप्रमाणे यज्ञविधीमध्ये कोणत्या पदार्थांचा उपयोग केल्यावर कोणते परिणाम दिसून येतात, यज्ञसिद्धी याविषयी विवेचन केले आहे. स्त्री-पुरुषांच्या दाम्पत्य जीवनाविषयी अतिशय सखोल टिप्पण मांडले. विश्ववारा हीस कर्म सिद्धांत मांडणारी म्हणून महत्त्वाचे मानले जाते. विश्ववाराच्या ऋग्वेदात रचलेल्या ऋचा हे स्पष्ट करतात की मानवी जीवनाच्या विकासासाठी स्त्रियांच्या हातात लेखणी आणि वाणीत सरस्वती असणे आवश्यक असते.

5) सुलभा : ही भारतातील महान विदुषी होऊन गेली. तिने ब्रह्मज्ञानी गुरूंच्या सान्निध्यात राहून कठोर ज्ञानसाधना केली. राजा जनकाच्या दरबारात जाऊन विद्वान असलेल्या राजा जनकाशी तपसाधना, ध्यान, योग, राजकार्य, आत्मसाक्षात्कार, ब्रह्मज्ञान यावर वाद-विवाद केला. त्यांच्या संवादात राजा जनकाने सुलभाने केलेल्या अनेक प्रश्नांचे स्पष्टीकरण केले. राजा जनक म्हणाला, विद्वान माणसाने राज्य गादीवर स्थानापन्न होऊन राज्यकारभार करणे म्हणजे सत्तेचा लोभ नसून राज्य करणे योग्य आहे. कारण जर चांगली व्यक्ती राजसत्तेतून बाहेर पडली तर स्वार्थी, सत्तालोलूप आणि भ्रष्ट लोकांचा प्रभाव वाढेल व प्रजेवर अन्याय होईल. परंतु जर ज्ञानी राजा राज्य करेल तर प्रजेमध्येही ज्ञानाचा प्रसार होऊन सुख संपन्नता येईल. सुलभाने राजा जनकाशी आत्मज्ञान आणि उत्तम राज्यकारभार यावर चर्चा केली. राजा जनकाने त्यावेळी तिच्या विद्वत्तेने प्रभावित होऊन तिचे पूजन केले. हे पूजन वास्तवत: सुलभामधील ज्ञानाला, विद्वत्तेला होते. तिच्या ज्ञानाने व तेजस्वी वाणीने जनक राजाची सभा चकित झाली. तिने स्पष्ट केले की, अध्ययनाने, आत्मज्ञानाने फक्त अध्यात्मिक प्रगतीच होते असे नाही तर भौतिक जगाला विकासाच्या शिखरावर नेता येते.

6) अरुंधती : वैदिक काळात स्त्रियांना शिक्षण घेता येत असत. काही स्त्रिया धनुर्विद्या म्हणजे शस्त्रकला याबरोबरच युद्धविद्याही शिकत असत. काही ग्रंथांत उल्लेख आहे की, वशिष्ठ ऋषींच्या आश्रमात संगीत आणि पर्यावरण संरक्षण याचे ज्ञान त्यांची पत्नी महान विदुषी अरुंधती स्वतः देत असत. हरित संहितेत अशी नोंद आहे की, स्त्रियांना दोन प्रकारे शिक्षण दिले जायचे. त्यात प्रथम प्रकार म्हणजे तिला विवाहाआधी असे शिक्षण दिले जायचे की त्याद्वारे ती सर्वंगुणसंपन्न गृहिणी होईल. दुसरा प्रकार म्हणजे ब्रह्मचर्य व्रताचे पालन करत जीवनभर ज्ञान प्राप्त करून ब्रह्मवादिनी बनता येईल. अशा दोन्ही प्रकारच्या शिक्षणाच्या सुविधा तिला उपलब्ध होत्या. वेद अध्ययन याव्यतिरिक्त गीत, संगीत, नृत्य, चित्रकला, शिल्प आणि शस्त्रविद्या अशा 64 कलांचे शिक्षण दिले जायचे.

स्वतः ज्ञानसाधना करण्याबरोबर अनेक विदुषी शिक्षका बनून ज्ञानदानाचे कार्य करत असत. आश्वालायन यांच्या गृहसूत्र यामध्ये उल्लेख मिळतो की, गार्गी, मैत्रिया, सुलभा, पडवा, प्रतिथेची या अध्यापक म्हणून ज्ञानदानाचे कार्य करत असत. वैदिककाळात बर्‍याचशा स्त्रिया शिक्षण घेत होत्या व शिकवत होत्या, हे मात्र निश्चितपणे लक्षात येते. मध्ययुगीन काळात देशाबाहेरील शत्रूंच्या आक्रमणांमुळे सामाजिक गुलामगिरी आणि स्त्री सुरक्षितता या कारणाने तिचे शिक्षण पूर्णतः बंद झाले. परंतु प्राचीन वेदकाळातील महिला विदुषींचे ज्ञान आ

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Maharashtra News : पानिपत येथे स्मारक उभारणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती

0
मुंबई | प्रतिनिधी | Mumbai मराठ्यांच्या शौर्याचे प्रतीक म्हणून पानिपत येथील कालाआंब परिसरात एक स्मारक (Memorial) उभारण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis...