Saturday, May 4, 2024
Homeनाशिकविद्यार्थ्यांच्या संशोधनात्मक गुणांना वाव देणे गरजेचे : डाॅ. म्हैसेकर

विद्यार्थ्यांच्या संशोधनात्मक गुणांना वाव देणे गरजेचे : डाॅ. म्हैसेकर

नाशिक l Nashik (प्रतिनिधी)

विद्यार्थ्यांच्या संशोधनात्मक गुणांना वाव देणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या अधिसभा बैठकीत कुलगुरु डॉ. दिलीप म्हैसेकर यांनी केलेे. या बैठकीस कुलसचिव डॉ. कालिदास चव्हाण व अधिसभा सदस्य बैठकीस उपस्थित होते. याप्रसंगी डॉ. सचिन मुंब्रे यांनी अधिसभेत अर्थसंकल्प सादर केला तर लेखा अहवाल डॉ. आशुतोष गुप्ता यांनी सादर केला.

- Advertisement -

कुलगुरु डॉ. म्हैसेकर यांनी सांगितले की, विद्यापीठ व संलग्नित महाविद्यालयात संशोधनाला चालना देण्यासाठी व प्रोत्साहन देण्यासाठी विद्यापीठात संशोधन विभाग या स्वंतत्र्य विभागाची स्थापना करण्यात आली आहे. विभागामार्फत संशोधनाशी संबंधित कामकाज चालविण्यात येत आहे. सर्व महाविद्यालयांनी देखील याच धर्तीवर स्वतंत्र संशोधन कक्ष स्थापन करण्याच्या सूचना देण्यात येणार आहेत. विद्यापीठ व महाविद्यालय स्तरावरील संशोधन विभागात समन्वय राखून संशोधनास प्रोत्साहन देणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.

कुलसचिव डॉ. कालिदास चव्हाण यांनी सांगितले की, आरोग्य विद्यापीठाचा विद्यार्थी हा केंद्रबिंदू असून अर्थसंकल्पात विद्यार्थ्यांसाठी तरतुदी व मोठया प्रमाणावर विकास कामे प्रस्तावित करण्यात आले आहेत. विद्यापीठाच्या सन २०२१-२२ अर्थसंकल्प परिरक्षण, विकास आणि स्वतंत्र प्रकल्प व योजना या तीन प्रकारात विभागला आहे.

या अर्थसंकल्पात विद्यापीठाचे एकत्रित उत्पन्न रु. ३५१२५ लक्ष इतके अपेक्षित असून उत्पन्नाच्या तुलनेत एकत्रित खर्च रुपये ३५६१६ लक्ष इतका अपेक्षित असल्याने वित्तीय तूट रुपये ४९१ लक्ष इतकी अपेक्षित आहे. संशोधन कार्यशाळा आणि परिषदांच्या मार्फत विद्यार्थी कल्याणकारी योजनेसाठी रु. ५०० लक्षची तरतूद करण्यात आली आहे. विद्यार्थी कल्याण विभागाअंतर्गत सामाजिक जाणीव जागृती लेखाशीर्षातर्गत अवयवदान, कुपोषण व स्वच्छमुख अभियान आदीकरीता रु. ३० लक्ष इतकी तरतूद करण्यात आली आहे.

विद्यापीठाचे मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, कोल्हापूर, लातूर येथील विभागीय केंद्रे सक्षम करण्यासाठी या अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली असून संशोधन व विकास कामे प्रस्तावित करण्यात आलेली आहेत.

त्यामध्ये ऐरोली येथील बांधकाम, नाशिक येथील विकास कामे, विभागीय केंद्र, नागपूर, औरंगाबाद, पुणे, कोल्हापूर येथील जमीन खरेदी व बांधकामे आदींचा समावेश आहे. विद्यापीठ व विभागीय केंद्राच्या ठिकाणी अद्ययावत संशोधन प्रयोगशाळांची निर्मिती करण्यासाठी रु. १० लक्ष इतकी तरतूद अर्थसकल्पात करण्यात आलेली आहे. विद्यापीठाच्या वतीने ई -लर्निंग सेंटर उभारण्यात येऊन, ई लेक्चर सीरीजचे आयोजन करण्यासाठी अर्थसंकल्पात रु. १०० लक्ष इतकी तरतूद करण्यात आलेली आहे.

या अर्थसंकल्पासाठी गठीत समितीमध्ये अध्यक्ष सचिन मुंब्रे तर सदस्य डॉ. श्रीकांत देशमुख, डॉ. धनाजी बागल, डॉ. बाबासो माळी, डॉ. प्रताप भोसले, ज्योती दुबे, डॉ. राजेश जाेंधळेकर, वैद्य निलाक्षी प्रधान, डॉ. अरुण डोडामणी, डॉ. समिर गोलावार, डॉ. आशुतोष गुप्ता, कुलसचिव डॉ. के. डी. चव्हाण, परीक्षा नियंत्रक डॉ. अजित पाठक, संदीप कुलकर्णी, वित्त व लेखाधिकारी नरहरी कळसकर होते.

कराेनाने मृत्यू झाल्यास विद्यार्थ्यांच्या कुटुंबाला मदत

विद्यापीठाने कराेना सुरक्षा कवच योजनेसाठी बाधीत विद्यार्थ्याला उपचारासाठी रु. एक लाख पर्यंत अर्थिक मदत किंवा दुर्देवी मृत्यू झाल्यास कुटूंबाला रु. तीन लक्ष अर्थिक मदत करण्याची तरतूद अर्थसकल्पात करण्यात आली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या