Monday, June 24, 2024
Homeमुख्य बातम्याCabinet Expansion : राज्यात पुन्हा एकदा मंत्रिमंडळ विस्तार?; भावी मंत्र्यांमध्ये आनंदाची लाट,...

Cabinet Expansion : राज्यात पुन्हा एकदा मंत्रिमंडळ विस्तार?; भावी मंत्र्यांमध्ये आनंदाची लाट, कुणाला मिळणार संधी?

मुंबई | Mumbai

- Advertisement -

राज्यातील शिंदे-फडणवीस-पवार सरकारचा (Shinde-Fadnavis-Pawar Government) रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार (Cabinet Expansion) गणेशोत्सवापूर्वी (Ganeshotsav) पार पडण्याची शक्यता वर्तविली जात असून त्यादृष्टीने हालचाली सुरु असल्याची माहिती समोर आली आहे. तर मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा सुरू होताच शिंदे गटात (Shinde Group) आनंदाची लाट पसरल्याचे बोलले जात आहे… 

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, सध्या भाजप (BJP) हा महायुतीतील (Maharashtra Politics) सर्वात मोठा पक्ष असल्याने या मंत्रिमंडळ विस्तारात त्यांच्या वाट्याला सर्वाधिक ७ जागा दिल्या जाणार आहे. तर उर्वरित मंत्रिपदावर शिंदे गट आणि अजित पवार गटातील आमदारांची (MLA) वर्णी लागण्याची शक्यता असून एकूण १४ आमदार मंत्रिपदाची शपथ (Ministerial Oath) घेणार असल्याचे समजते आहे. तसेच यावर महायुतीतील वरिष्ठ नेत्यांमध्ये मुंबईतील (Mumbai) बैठकीत चर्चा झाल्याची माहिती देखील समोर आली आहे.

Ind vs Pak : राखीव दिवशीही भारत-पाकिस्तान सामना रद्द झाल्यास काय होणार? काय असेल समीकरण?

दुसरीकडे मंत्रिमंडळ विस्तारात मुख्यमंत्री शिंदेंच्या शिवसेनेत अधिक स्पर्धा आहे. यात आमदार संजय शिरसाट, भरत गोगावले, योगेश कदम, प्रताप सरनाईक, संजय गायकवाड, चिमणराव पाटील, सुहास कांदे यांचा समावेश आहे. तसेच यामध्ये आमदार भरत गोगावलेंनी फक्त मंत्रिपदच नाही तर रायगडच्या पालकमंत्रिपदाचा शब्द देण्यात आल्याचा दावा केला आहे. याशिवाय अपक्ष आमदार बच्चू कडू हे देखील मंत्रीपदासाठी उत्सुक आहेत. त्यामुळे या विस्तारात शिंदे-फडणवीस-पावर सरकार कुणाकुणाला संधी देते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Thane band : मराठा आरक्षणाची धग कायम! आज ‘ठाणे बंद’ची हाक, शहरात चोख बंदोबस्त

दरम्यान, दीड वर्षांपूर्वी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह ४० आमदारांनी शिवसेनेतून बंड करत भाजपसोबत हातमिळवणी करत राज्यात शिंदे-भाजपचे सरकार स्थापन केले होते. यामध्ये एकनाथ शिंदे यांची मुख्यमंत्री तर देवेंद्र फडणवीस यांची उपमुख्यमंत्रीपदी वर्णी लागली होती. तसेच पहिल्या टप्प्यात शिंदे आणि भाजपमधील १८ मंत्र्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली होती.

भीषण अपघात! बोट बुडाल्याने २६ जणांना जलसमाधी; अनेक जण बेपत्ता

- Advertisment -

ताज्या बातम्या